अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:07+5:302020-12-31T04:32:07+5:30
अवैध वृक्षतोड अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत आद्यकवी मुकुंदराज स्वामी परिसर, संतकवी दासोपंत स्वामी परिसर, रेणुकादेवी परिसर, नागनाथ ...
अवैध वृक्षतोड
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत आद्यकवी मुकुंदराज स्वामी परिसर, संतकवी दासोपंत स्वामी परिसर, रेणुकादेवी परिसर, नागनाथ परिसर, या परिसरात वनविभागाची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. शहरापासून दूर असलेल्या या परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. हा परिसर वृक्षांनी चांगला बहरलेला असतांना वेळीच वनविभागाने या परिसरातील अवैध वृक्षतोड थांबवून हा परिसर योग्य स्थितीत ठेवावा
शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा
अंबाजोगाई -: कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल. तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघातातील प्रसंग ओढावल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे. शेतमजुरांना असे विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी माकप नेते कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे.