अंतर्गत रस्त्यावरून जड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:33 AM2021-02-10T04:33:31+5:302021-02-10T04:33:31+5:30
अवैध वृक्षतोड अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत आद्यकवी मुकुंदराज स्वामी परिसर, संतकवी दासोपंत स्वामी परिसर, रेणुकादेवी परिसर, नागनाथ ...
अवैध वृक्षतोड
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरालगत आद्यकवी मुकुंदराज स्वामी परिसर, संतकवी दासोपंत स्वामी परिसर, रेणुकादेवी परिसर, नागनाथ परिसर, या परिसरात वनविभागाची वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. शहरापासून दूर असलेल्या या परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. हा परिसर वृक्षांनी चांगला बहरलेला असतांना वेळीच वनविभागाने या परिसरातील अवैध वृक्षतोड थांबवून हा परिसर योग्य स्थितीत ठेवावा
.
शेतमजुरांना विमा कवचाची प्रतीक्षा
अंबाजोगाई : कोरोनाच्या काळात शेतमजुरांना रोजगारासाठी विविध ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. एकाच ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नसल्याने जिथे काम मिळेल. तिथे रोजगारासाठी जावे लागते. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग, अपघातील प्रसंग ओढावल्यास शेतमजुरांना विमा कवच असले पाहिजे. शेतमजुरांना असे विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी माकप नेते कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केली आहे.
हातगाडे रस्त्यावर
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या संदर्भात नगर परिषद प्रशासनाने हे हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.
भाजीपाल्याच्या दरात घसरण
अंबाजोगाई : ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरांमध्ये अचानकच घसरण झाली आहे. टमाटे, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, सिमला मिरची, हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दरही कमी झाल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.