बाहेरच्या जिल्ह्यांतील दरोडेखोरांचा बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:51 AM2018-08-21T00:51:19+5:302018-08-21T00:51:59+5:30

Hedos in many places in Beed district in the outskirts of the district | बाहेरच्या जिल्ह्यांतील दरोडेखोरांचा बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हैदोस

बाहेरच्या जिल्ह्यांतील दरोडेखोरांचा बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हैदोस

Next

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. हे सर्व परभणी, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले आहेत. सोमवारी पहाटे परळी व नेकनूरमध्ये सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

परभणी जिल्ह्यातील सहा दरोडेखोर रविवारी रात्री बसने परळीला आले. येथून रिक्षाने अंबाजोगाईला गेले. तिथे एका ठिकाणी जीप चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु हॉर्न वाजल्याने परिसरातील नागरिक जागे झाले अन् त्यांचा प्रयत्न फसला. पुढे प्रशांतनगर भागात जाऊन त्यांनी कार (एमएच १३ एसी ५६१०) चोरली. या कारमधूनच दरोडा टाकण्यासाठी ते घर शोधत होते. एवढ्यात अंबाजोगाई शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे गस्त घालताना त्यांना आडवे गेले. मुंडे यांनी कारला हात दाखवला.

पोलिसांना पाहून कार सुसाट धर्मापुरी मार्गे घाटनांदूरकडे गेली. येथे रेल्वे ट्रॅकवर कार थांबवून सहा दरोडेखोरांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली अन् अंधाराचा फायदा घेत ते बाजूच्या शेतातून परळी रोडवर आले. येथे एका रिक्षात बसून ते परळीकडे निघाले. रस्त्यात महामार्ग पोलिसांनी अडवले. यावेळी त्यांनी नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असल्याची बतावणी दिली अन् निघून गेले.

पाठीमागे अंबाजोगाई शहर व ग्रामीण तसेच परळी शहर व ग्रामीण, आरसीपी असा सर्व फोर्स परळीकडे गेला. येथे बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात तपासणी केली. यावेळी वर्दीवर असलेल्या पोलिसांना पाहून हे सहाही दरोडेखोर येथून पळाले. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन यातील करनसिंग गगनसिंग टाक (रा. साकला, जि. परभणी) याला पकडले. इतर दरोडेखोर मात्र बाजूला असलेल्या जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. पाऊस व घनदाट झाडीमुळे दरोडेखोर शोधण्यात पोलिसांना अडथळे आले. उशिरापर्यंत शोध मोहीम हाती घेतली मात्र पोलिसांना यश आले नाही. असे असले तरी परभणीच्या दरोडेखोरांचा अंबाजोगाईत आखलेला प्लॅन पोलिसांच्या गस्तीमुळे अयशस्वी ठरला.
अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे व त्यांचे टीम, अंबाजोगाई ग्रामीण व शहर, परळी ग्रामीण व शहर या पोलिसांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.

कारमध्ये आढळली चोरलेली दोन डुकरे
दरोडेखोरांनी अंबाजोगाईत दोन डुकरेही चोरांनी कारमध्ये डांबली होती. घाटनांदूरमध्ये कार सोडून पळाल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीत हा प्रकार समोर आला. कारमध्ये आढळलेल्या पासबुकावरुन ती अंबाजोगाईतील असल्याचे समजले.

जामखेडपासून पाठलाग करून महाजनवाडीमध्ये पाच दरोडेखोर जेरबंद
जामखेडमार्गे बीड जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी नऊ जणांची टोळी येत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे दरोडा प्रतिबंधक पथकाने नेकनूर पोलिसांच्या मदतीने जामखेडपासून पाठलाग केला. बीड तालुक्यातील महाजनवाडी परिसरात सापळा लावला. तीन दुचाकींवरुन नऊ जण येत असल्याचे दिसताच पोलिसांनी झडप घातली. यावेळी त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडा प्रतिबंधक, नेकनूर पोलीस व आरसीपीच्या जवानांनी त्यांचा पाठलाग करुन नऊपैकी पाचजणांना अटक केली. यामध्ये योगेश विष्णू पवार (३०, अहमदनगर), शहादेव राजाभाऊ चादर (३०, क्रांतीनगर, पाटोदा), आकाश अशोक चव्हाण (२४, मुकींदपूर, अहमदनगर), राहुल शाम काळे (२५, हर्सूल तलावाजवळ, औरंगाबाद), भूपेंद्र महावीर सहानी (रा. मुज्जफरपूर, बिहार) यांचा आरोपीत समावेश आहे. इतर चौघे पलायन करण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याकडून तीन दुचाकी, तीन मोबाईल, रोख सहा हजार रुपये, दरोड्यासाठी लागणारे साहित्य, धारदार शस्त्रे जप्त केली. त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास हा थरार घडला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. भाऊसाहेब गोंदकर, सपोनि गजानन जाधव, पोउपनि वाटोरे, भारत माने, मुंजाबा सौंदरमल, राजाभाऊ नागरगोजे, श्रीमंत उबाळे, संजय खताळ, हरिभाऊ बांगर, अशोक दुबाले, भारत बंड, राहुल शिंदे, चालक साबळे, सोनवणे, डोंगरे, गौतम वाघमारे, महेश अधटराव, ढाकणे, काळे, बागवान, यादव यांनी केली.

Web Title: Hedos in many places in Beed district in the outskirts of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.