कोरोनाचा उच्चांक; १५२९ नवे रुग्ण तर २५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:33+5:302021-05-01T04:32:33+5:30
बीड : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यभर संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत; मात्र जिल्ह्यात 'चेन ब्रेक' होण्याऐवजी संसर्ग वाढतच ...
बीड : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यभर संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत; मात्र जिल्ह्यात 'चेन ब्रेक' होण्याऐवजी संसर्ग वाढतच चालला आहे. शुक्रवारी रुग्ण संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला. उच्चांकी १ हजार ५२० रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. एक हजारावर रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ३३१ इतकी आहे.
जिल्ह्यात गुरुवारी ४ हजार ७१७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी तीन हजार १९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर एक हजार ५२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २९८ रुग्ण आढळले. अंबाजोगाई २३६, आष्टी १८७, धारुर ८६, गेवराई १५५, केज १९८, माजलगाव ६५, परळी ११६, पाटोदा ६५, शिरुर ८०, वडवणी तालुक्यातील ३४ रुग्णांचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या ५४ हजार ११ इतकी झाली आहे. शुक्रवारी १०१३ जण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा ४६ हजार १६६ इतका आहे. २५ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. बळींची संख्या ९१४ इतकी झाली असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.
मृत्यूसत्र थांबेना; चिंता वाढली
कोरोनाबाधितांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या २५ बळींमध्ये २० ते ३० एप्रिल दरम्यान मृत झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. यात अंबाजोगाईतील हौसिंग सोसायटी येथील ५९ वर्षीय पुरुष, गुरुवारपेठेतील ४७ वर्षीय पुरुष,मोरेवाडीतील ६० वर्षीय महिला, गांधी चौकातील ७३ वर्षीय पुरुष, तालुक्यातील लाडझरी येथील ६५ वर्षीय पुरुष, बीडमधील धानोरा रोडवरील ६५ वर्षीय पुरुष, नृसिंह कॉलनीतील ४० वर्षीय महिला, तालुक्यातील कोल्हेरवाडी येथील ३७ वर्षीय महिला, अंथरवणपिंप्री येथील ७० वर्षीय महिला,कारी (ता.धारुर) येथील ७५ वर्षीय महिला,गेवराई तालुक्यातील भेंड खुर्द येथील ६० वर्षीय महिला, गढी येथील ४२ वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील चिंचोली येथील ६३ वर्षीय पुरुष,नांदूरघाट येथील ४९ वर्षीय पुरुष, सारणी येथील ३२ वर्षीय पुरुष,माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, काडीवडगाव येथील ६५ वर्षीय महिला, मंजरथ येथील ७० वर्षीय पुरुष,पाटोदा येथील ७१ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, सौताडा येथील ४८ वर्षीय पुरुष, बेलेवाडी येथील ७० वर्षीय महिला, सावरगाव येथील ७० वर्षीय महिला, शिरुर तालुक्यातील पौळाचीवाडी येथील २५ वर्षीय पुरुष, वडवणी येथील ५५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.