कोविड योद्धा मनोज जोशींच्या कुटुंबास ग्रामसेवक संघटनेची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:10+5:302021-06-11T04:23:10+5:30

बीड : कोविडविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना बीड पंचायत समिती अंतर्गत येळबंघाट व खापरपांगरी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मनोजकुमार जोशी यांचे ...

The help of Gramsevak Sanghatana to the family of Kovid warrior Manoj Joshi | कोविड योद्धा मनोज जोशींच्या कुटुंबास ग्रामसेवक संघटनेची मदत

कोविड योद्धा मनोज जोशींच्या कुटुंबास ग्रामसेवक संघटनेची मदत

Next

बीड : कोविडविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना बीड पंचायत समिती अंतर्गत येळबंघाट व खापरपांगरी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मनोजकुमार जोशी यांचे कोविड-१९ आजारामुळे उपचारादरम्यान अकाली निधन झाले होते. जोशी कुटुंबावर मोठा दुःखाचा आघात झाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई १३६ तालुका शाखा बीडच्या वतीने मदतीच निर्णय घेतला. गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, पंचायत व कृषी विभागाचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत सद्‌भावनेची परंपरा कायम ठेवली. एक लाख पाच हजार रुपयांचा धनादेश दिवंगत मनाेज जोशी यांच्या पत्नी व मोठे बंधू यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी शेळके, युनियनचे जिल्हा सरचिटणीस भगवानराव तिडके,उपाध्यक्ष मधुकर शेळके, कल्याणराव राऊत ,बीड तालुकाध्यक्ष सखाराम काशीद,सचिव भाऊसाहेब मिसाळ, सहसचिव प्रवीण तेलप, वाघमारे आदी उपस्थित होते.

===Photopath===

090621\041309_2_bed_33_09062021_14.jpeg

===Caption===

ग्रामसेवक युनियनतर्फे मदत

Web Title: The help of Gramsevak Sanghatana to the family of Kovid warrior Manoj Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.