कलाशिक्षकांच्या साधनेमुळे बीड जिल्ह्याचा लौकीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:04 AM2018-03-30T01:04:51+5:302018-03-30T11:35:18+5:30

कलासाधनेतून बीड हा कलावंताचा जिल्हा म्हणून देशात नावारुपाला आला, असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

With the help of the help of the Teletalk instructors, Beed district's cosmopolitanism | कलाशिक्षकांच्या साधनेमुळे बीड जिल्ह्याचा लौकीक

कलाशिक्षकांच्या साधनेमुळे बीड जिल्ह्याचा लौकीक

Next
ठळक मुद्देदोन दिवसीय राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषदेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विद्यार्थ्यांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्याची जबाबदारी कला शिक्षकांची असून हे सतीचे वाण कला शिक्षक मोठ्या ताकदीने जोपासत आहेत. बीड जिल्ह्याच्या मातीने अनेक कलावंत जन्मास घातले आहे. कलासाधनेतून बीड हा कलावंताचा जिल्हा म्हणून देशात नावारुपाला आला, असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.

गुरूवारी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे संलग्न बीड जिल्हा कलाध्यापक संघाच्या ३९ व्या राज्यस्तरीय दोन दिवसीय कलाशिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, कलाध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष पी.आर.पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, दादासाहेब भगाटे, एम.ए.कादरी, हिरामण पाटील, नरेंद्र बारई, दादासाहेब लाड, सुभाष पाटील, सुभाष वानखेडे, विश्वास ससे, रमेश जाधव, प्रियंवदा तांबोटकर, विठ्ठल बहीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, दादासाहेब भगाटे, एम.ए.कादरी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी गणेश विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत तर चंपावती विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विठ्ठल बहीर यांनी केले. तर यावेळी आदिनाथ आदमाने, मोहन गवते, सुरेश चव्हाण, सुधीर गिराम, पल्लवी भगत, सुरेंद्र चव्हाण, सुभाष टेकाळे, कल्याण रांजवण, अर्चना वाकडे, मंगेश रोटे, सुरेश रांजवण, सुभाष टेकाळे, शिवरूद्र कोयटे, सचिन नन्नवरे, कालिदास वाघ, कैलास स्वामी, विलास सिरसाट, गणेश कदम, शिवप्रसाद राजनोळ, बिभीषण मगर, भीमाशंकर मराठे, मोराळे महेशसह राज्यभरातून आलेले कला शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, कला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कला तपस्वी पुरस्कार
या कार्यक्रमात बीड येथील चंपावती विद्यालयाचे कला शिक्षक रमेश जाधव तसेच दीपक गायकवाड यांना कला तपस्वी पुरस्काराचे वितरण तर त्रिंबक पोखरकर यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

३५ जिल्ह्यात संघटना, ५१ वर्ष
राज्याध्यक्ष पी.आर.पाटील म्हणाले, कला शिक्षक संघटनेला ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील ३५ जिल्ह्यात संघटनेचे कार्य सुरु आहे. कला आणि क्रीडा शिक्षक हे महत्त्वाचे घटक असून शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी त्यांचे योगदान आवश्यक आहे.

Web Title: With the help of the help of the Teletalk instructors, Beed district's cosmopolitanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.