बहिणीच्या लग्नात टळलेल्या खर्चातून वृद्धाश्रमाला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:26+5:302021-05-05T04:55:26+5:30

केज शिवसेना युवासेनेचे शहर प्रमुख तात्या रोडे यांची बहीण रूपालीचा विवाह वाकनाथपूर येथील नारायण गांडगुळे यांच्याशी लाॅकडाऊनचे पालन करून ...

Help the old age home from the expenses incurred in the sister's marriage | बहिणीच्या लग्नात टळलेल्या खर्चातून वृद्धाश्रमाला मदत

बहिणीच्या लग्नात टळलेल्या खर्चातून वृद्धाश्रमाला मदत

googlenewsNext

केज शिवसेना युवासेनेचे शहर प्रमुख तात्या रोडे यांची बहीण रूपालीचा विवाह वाकनाथपूर येथील नारायण गांडगुळे यांच्याशी लाॅकडाऊनचे पालन करून २५ नातेवाइकांच्या उपस्थितीत ‌४ मे रोजी साध्या पद्धतीने पार पडला. या लग्नामध्ये होणाऱ्या खर्चाचा अपव्यय टाळण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख रत्नाकर अप्पा शिंदे यांच्या सल्ल्यानंतर तात्या रोडे यांनी वडील तुकाराम रोडे व आई शीलाबाई रोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, वृद्धाश्रमाला दहा हजार रुपयांचा किराणा घेऊन देण्याचा निर्णय घेतला.

बहिणीचा विवाह पार पडल्यानंतर तात्या रोडे यांनी निराधार वृद्धांसाठी दहा हजार रुपयांचा किराणा, सॅनिटायजर, मास्क खरेदी केले. कळसंबर येथील ‘आपला वृद्धाश्रम’ येथे जाऊन मनिषा पवार यांच्याकडे हे साहित्य सुपुर्द केले.

यावेळी युवासेनेचे तालुकाप्रमुख अरविंद थोरात, अनिकेत शिंदे, अभिजीत घुले, आदित्य अंधारे, ऋषी घुले, प्रशांत मुरकुटे, प्रवीण गाढवे, सचिन सौदागर, तसेच वृद्धाश्रमाच्या संचालिका मनिषा पवार व सहकारी उपस्थित होते.

===Photopath===

040521\deepak naikwade_img-20210504-wa0020_14.jpg

Web Title: Help the old age home from the expenses incurred in the sister's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.