किल्ले धारूर युथ क्लबतर्फे ऑक्सिमीटर, डस्टबीनची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:33 AM2021-05-26T04:33:47+5:302021-05-26T04:33:47+5:30
धारूर : येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरला किल्ले धारूर युथ क्लबचेवतीने मंगळवारी दैनंदिन ...
धारूर : येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरला किल्ले धारूर युथ क्लबचेवतीने मंगळवारी दैनंदिन उपयोगात येणाऱ्या वस्तू देण्यात आल्या.
कोरोना संकट काळात युथ क्लबच्या वतीने प्रशासनास मदत व सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. क्लबने शहरातील कस्तुुरबा गांधी बालिका विद्यालयात सुरू असणाऱ्या कोविड सेंटरवर १०० कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. युवक नेते रमेश आडसकर यांनी वैद्यकीय सेवा सोडता सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेंटरवर किल्ले धारूर युथ क्लबने ऑक्सिमीटर, डस्टबीन, झाडू हे साहित्य देण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी स्वाती डिकले, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक चेतन आदमाने, अमोल दुबे, मयूर सांवत यांच्याकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी यूथ क्लबचे अध्यक्ष गौतम शेंडागे, सचिव रवी गायसमूद्रे, सुरेश शिनगारे, सूर्यकांत जगताप, अविनाश चिद्रवार, अनिल तिवारी, धंनजय भावठाणकर, विशाल दिख्खत, अमर औताडे उपस्थित होेते.
===Photopath===
250521\img_20210524_122134_14.jpg
===Caption===
किल्लेधारूर युथ क्लबच्या वतीने कोविड सेंटरला ऑक्सिमीटर, डस्टबीन वस्तू भेट देताना क्लबचे पदाधिकारी.