पालावरच्या कुटुंबांंना दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:33 AM2021-05-13T04:33:50+5:302021-05-13T04:33:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : कोरोनाने थैमान घातले असताना हातावर पोट असलेल्या व शहराबाहेर राहत असलेल्या पालावरील ६५ ...

A helping hand to the families of Palavar | पालावरच्या कुटुंबांंना दिला मदतीचा हात

पालावरच्या कुटुंबांंना दिला मदतीचा हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : कोरोनाने थैमान घातले असताना हातावर पोट असलेल्या व शहराबाहेर राहत असलेल्या पालावरील ६५ कुटुंबीयांना येथील युवकांनी सामाजिक बांधीलकी जपत मदतीचा हात दिला आहे. हे युवक दररोज पालावर जाऊन अन्नसेवेचा उपक्रम राबवीत आहेत. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने माजलगाव शहराबाहेर पंढरपूर, औंढा, हिंगोली जिल्ह्यातील गोसावी, डवरी गोसावी, डबेवाले कुटुंब राहत आहेत. लॉकडाऊन असल्याने त्यांच्या हाताला काम राहिले नाही. त्यामुळे पोट कसे भरायचे, असा प्रश्न येथील कुटुंबीयांसमोर आहे. हे लोक खेडोपाडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. याबाबत माध्यमात वृत प्रकाशित करून त्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळाला होता. बाहेर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, जनआक्रोश भ्रष्टाचार विरोधी महिला संघटनेने किराणा कीट देत मदतीचा हात दिला होता. मात्र, यापुढे जाऊन शहरातील धनंजय जोगडे, अजित रांजवण, विशाल सुक्रे, महेश जोगडे या सजग युवकांनी त्यांच्यातील माणुसकी दाखवत या ६५ कुटुंबीयांना गत पंधरवड्यापासून थेट पालावर जाऊन त्यांना अन्नदान पुरविण्याचे कार्य सुरू केले आहे.

...

आम्ही तुमच्यासोबत..

पालावरील या लोकांना या अडचणीच्या काळात तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या मदतीला आहोत, असा धीर या युवकांनी दिला आहे. युवकांची सेवा पाहून शहरातील काही दानशुरांनीही गुप्तपणे याला आर्थिक पाठबळ दिल्याने युवकांचाही उत्साह द्विगुणित झाला आहे.

...

फोटो ओळी - माजलगाव शहराबाहेर राहणाऱ्या पालावरच्या ६५ कुटुंबीयांना अन्नदान वाटप करताना युवक.

===Photopath===

120521\purusttam karva_img-20210509-wa0040_14.jpg

Web Title: A helping hand to the families of Palavar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.