शवहाताळणी करणाऱ्या त्या सहा कामगारांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:55+5:302021-05-21T04:34:55+5:30

अंबाजोगाई : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड विभागांतर्गत शवहाताळणी करणाऱ्या सहा कंत्राटी कामगारांच्या व्यथांना ‘लोकमत’च्या माध्यमातून वाचा फोडण्यात ...

Helping the six autopsy workers | शवहाताळणी करणाऱ्या त्या सहा कामगारांना मदत

शवहाताळणी करणाऱ्या त्या सहा कामगारांना मदत

Next

अंबाजोगाई : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड विभागांतर्गत शवहाताळणी करणाऱ्या सहा कंत्राटी कामगारांच्या व्यथांना ‘लोकमत’च्या माध्यमातून वाचा फोडण्यात आली होती. त्याची दखल घेत शहरातील ज्ञान प्रबोधिनी व ग्राम उर्जा फाउंडेशनच्या वतीने त्यांना अन्नधान्याची किट देऊन मदतीचा हात देण्यात आला.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एफएमटी विभागात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे, सदानंद वालेकर, ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे अशोक हातागळे, एफएमटी विभागाचे प्राध्यापक तथा उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, सहयोगी प्राध्यापक डॉ. विश्वजित पवार, डॉ. प्रमोद दोडे, डॉ. युवराज कांबळे, डॉ. लक्ष्मी, अमित फटाले, डॉ. रोहित फटाले आदी उपस्थित होते.

यावेळी नंदकिशोर मुंदडा, प्रल्हाद चिक्षे यांनी शव हाताळणी करणारे कंत्राटी कामगार राहुल गित्ते, महेश वेदपाठक, युवराज काळे, आदित्य सोमवंशी, अरबाज, राहुल गोरे यांच्या शव हाताळणी करतांना व प्रपंच चालवताना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी आपण आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी या शवहाताळणी करणाऱ्या सहा कंत्राटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्याची कीट व हापूस आंबे देण्यात आले.

Web Title: Helping the six autopsy workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.