अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली?

By सोमनाथ खताळ | Published: September 11, 2023 11:13 AM2023-09-11T11:13:49+5:302023-09-11T11:17:10+5:30

Beed: शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत.

Hey, what's going on? When will take seriously? | अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली?

अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली?

googlenewsNext

- सोमनाथ खताळ
बीड : शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत.

राज्यात मागील चार महिन्यांतील मृत्यू 
३,१९७ (बालक (एक ते पाच वर्षे वयोगट))
२८० (माता)
यातील १८७ माता व १,०९० बालकांचीच आरसीएच  पोर्टलवर नोंद

या जिल्ह्यांत सर्वांत जास्त बालमृत्यू
नंदुरबार, अमरावती, बीड, नाशिक, अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये. माता मृत्यूमध्येही हेच जिल्हे आघाडीवर 

बालमृत्यूची कारणे
nन्यूमोनिया (श्वसनदाह) 
nअतिसार 
nजन्मत: व्यंग असणे 
nअचानक बाळ मृत होणे 
nजंतुसंसर्ग कुपोषण  

माता मृत्यूची नेमकी कारणे काय?
अतिरक्तस्राव, उच्च रक्तदाब, गरोदरपणात रक्त गोठण्याच्या पद्धतीत बदल होणे, गरोदरपणातील विविध गुंतागुंत, जंतुसंसर्ग, शस्त्रक्रियेची गुंतागुंत, आरोग्य संस्थेत वेळेत न येणे, वाहतुकीची सोय नसणे, जास्त काळ घरीच थांबणे, प्रसूतिपश्चातच्या गुंतागुंत, कमी रक्त असणाऱ्यांकडून नियमित रक्तवाढीच्या गोळ्या न घेणे 

अन्वेषण समिती करते तरी काय?
माता व बालमृत्यू झाल्यानंतर याचे अन्वेषण करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर समिती आहे
या समित्यांकडून कारणे शोधली जातात; परंतु, भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या? याची माहिती समोर येत नाही.

तांत्रिक अडचण असल्याने आरसीएच पोर्टलवर सर्वच मृत्यूची नोंद झाली नाही; परंतु, दोन दिवसांपूर्वीच तालुका आरोग्य अधिकारी ते उपसंचालक यांची ऑनलाइन बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. आगामी काळात हा आकडा कमी होईल. 
-पु. ना. गंडाळ, उपसंचालक माता आरोग्य, पुणे 

Web Title: Hey, what's going on? When will take seriously?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.