अहो आश्चर्य... चालकाविनाच धावली ‘शिवशाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:21 AM2019-06-14T07:21:56+5:302019-06-14T07:22:22+5:30

अंंबेजोगाईतील घटना : बस प्रवेशद्वाराला धडकली, बसचे मोठे नुकसान

Hey wonder ... 'Shivshahi' runs without the driver | अहो आश्चर्य... चालकाविनाच धावली ‘शिवशाही’

अहो आश्चर्य... चालकाविनाच धावली ‘शिवशाही’

Next

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील राज्य परिवहन मंडळाच्या आगारात उभी शिवशाही बस अचानक सुरु झाली आणि उतारामुळे थेट प्रवेशद्वाराला जाऊन धडकली. या अपघातात एक चालक जखमी झाला असून बस आणि प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, प्रवेशद्वाराला धडकून न थांबता बस बाहेर रस्त्यावर आली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

एमएच ०६ बीडब्ल्यू ०६४६ ही शिवशाही बस वातानुकुलीत यंत्रणा बंद पडल्यामुळे मुंबईला पाठविली होती.
गुरु वारी सकाळीच ही बस दुरु स्त होऊन आली आणि आगारात प्रवेशद्वारासमोर लावली होती. सायंकाळी साडेसहा वाजता ही बस अचानक सुरु झाली. उतारावर उभी असल्याने ती सरळ प्रवेशद्वारातून बाहेर मुख्य रस्त्याच्या दिशेने निघाली. परंतु, अंबाजोगाईकरांचे दैव बलवत्तर म्हणून ही बस प्रवेशद्वाराला धडकली आणि तिथेच थांबली. आगारासमोरचा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. ही बस तशीच वेगात असती तर मुख्य रस्त्यावर गेली असती मोठी दुर्घटना घडली असती. बसचा वेग एवढा होता की, या अपघातात लोखंडी प्रवेशद्वार आणि भिंत दोन्ही जमीनदोस्त झाले. तर समोरची काच फुटून आणि पत्रा तुटल्यामुळे बसचे जवळपास २० हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बसच्या धडकेत चालक ए. एच. मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

बस कशी सुरु झाली
ही बस हॅन्डब्रेक लावून उभी केलेली होती. बस आपोआप सुरु झाली कि कोणी केली याचा अद्याप उलगडा झाला नाही. बस आपोआप सुरु होऊ शकत नाही असे तंत्रज्ञांचे म्हणणे आहे. मग बसमध्ये जाऊन बस सुरु करून आणि हॅन्डब्रेक काढून ती रस्त्याच्या दिशेने जाऊ देण्यामागे कोणाचा काय उद्देश होता हे समोर येणे आवश्यक आहे. अनेकांचा जीव धोक्यात घालणारा तो व्यक्ती आगारातीलच आहे कि बाहेरचा याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, मात्र उशिरापर्यंत त्यातील फुटेज मिळू शकले नव्हते.

चौकशी सुरू आहे
या घटनेची चौकशी सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेसाठी जबाबदार व्यक्ती कोण हे समजू शकेल. हे फुटेज मी स्वत: मुंबई येथे घेऊन जाणार आहे. दोषीवर कारवाई करण्यात येईल.
- शिवराज कराड, आगार प्रमुख, अंबाजोगाई.

Web Title: Hey wonder ... 'Shivshahi' runs without the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.