सुट्टीसाठी महिला पोलिसाने मॅटमध्ये दाद मागावी , उच्च न्यायालयाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:54 AM2017-11-28T05:54:23+5:302017-11-28T05:54:23+5:30
लिंगबदल शस्त्रक्रियेकरिता सुट्टी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणा-या महिला पोलीस हवालदाराला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.
मुंबई : लिंगबदल शस्त्रक्रियेकरिता सुट्टी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणा-या महिला पोलीस हवालदाराला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.
हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने, याचिकाकर्त्यांनी थेट उच्च न्यायालयात न येता, आधी मॅटकडे दाद मागणे अपेक्षित आहे. तेथे दिलासा न मिळाल्यास, याचिकाकर्त्या उच्च न्यायालयात येऊ शकतात, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांनी म्हटले आहे.
बीडच्या ललिता साळवे यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठांकडे एक महिन्याची सुट्टी मागितली. मात्र, बीड पोलीस अधीक्षकांनी त्यांचा सुट्टीचा अर्ज फेटाळला. त्यामुळे ललिता साळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
ललिता साळवे यांची महिला गटातून पोलीस दलात भरती झाली आहे. शस्त्रक्रियेनंतरही आपली नोकरी कायम राहावी. शस्त्रक्रियेनंतर आपल्याला पुरुष समजून पोलीस दलातील नोकरी कायम ठेवण्याचे निर्देश पोलीस महासंचालक व बीड पोलीस अधीक्षकांना द्यावेत, अशी विनंती साळवे यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे.
वाय गुणसूत्रांचे प्रमाण अधिक
याचिकेनुसार, ललिता २३ जूनला जे.
जे. रुग्णालयात शारीरिक व हार्मोन चाचणीकरिता भरती झाल्या होत्या. त्यांच्या वैद्यकीय चाचणीत त्यांच्यात वाय गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशनही करून घेतले. त्यात त्यांना
‘जेंडर डायसोफोरिया’ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी याबाबत लिंगबदलाचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला हा लिंगबदलाचा निर्णय योग्य असल्याचे
त्यांना जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.
अधिकाराचे उल्लंघन