महामार्ग अपूर्ण, काम लवकर पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:19 AM2021-03-29T04:19:43+5:302021-03-29T04:19:43+5:30

विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा अनियमित व अचानकच कमी-जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रामध्ये ...

Highway unfinished, work to be completed soon | महामार्ग अपूर्ण, काम लवकर पूर्ण करावे

महामार्ग अपूर्ण, काम लवकर पूर्ण करावे

Next

विद्युत रोहित्रात वारंवार बिघाड

वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा अनियमित व अचानकच कमी-जास्त दाबाने होत असल्याने रोहित्रामध्ये बिघाड होतो. परिणामी हे बिघडलेले रोहित्र आठ ते दहा दिवस बदलून मिळत नाहीत. रोहित्रात होणारे बिघाड शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. महावितरणने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी

बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुद्ध पाणी पुरविण्याची मागणी होत आहे.

पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास

शिरूर कासार : पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. साधे पेट्रोल ९८ तर स्पीड पेट्रोल १०० रुपये लिटर मिळत आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले असून, पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

Web Title: Highway unfinished, work to be completed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.