धारूर शहरात ऐतिहासिक होळी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:10+5:302021-03-31T04:34:10+5:30
धारूर : शहरात ऐतिहासिक होळी उत्सवाची पाच दिवसांची परंपरा कोरोना काळातही सर्व नियमांचे पालन करत अखंडपणे सुरू ठेवण्यात ...
धारूर : शहरात ऐतिहासिक होळी उत्सवाची पाच दिवसांची परंपरा कोरोना काळातही सर्व नियमांचे पालन करत अखंडपणे सुरू ठेवण्यात आली. शहरातील कटघरपुरा भागात चाचर काढून हा उत्सव साजरा करण्यात आला. परंपरा व मानाप्रमाणे पाच दिवस सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
धारूर शहरात प्रतिवर्षी होळी उत्सव होळीपासून म्हणजेच फाल्गुनी पौर्णिमेपासून साजरा करण्यात येतो. होळी उत्सव या वर्षीही परंपरेप्रमाणे उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटवून रंगाची उधळण करत या उत्सवाची सुरुवात झाली. पाच दिवस राजपूत समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळी व संध्याकाळी सांस्कृतिक कला जोपासणाऱ्या गीतांचे गायन करत ढोलकी, झांझ वाजवत शहरांमध्ये कटघरपुरा भागात चाचर काढली. त्याचप्रमाणे दुपारी मानाप्रमाणे थंडाईचा कार्यक्रम एका राजपूत कुटुंबाच्या घरी आयोजित केला जातो. ही परंपरा कोरोना काळातही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून कायम ठेवण्याचे काम या समाज बांधवांनी केले.
===Photopath===
300321\img_20210329_213944_14.jpg~300321\img_20210329_214016_14.jpg