वंजारी-धनगर एकत्र आले तर इतिहास घडेल; आमदार गोपीचंद पडळकरांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2022 10:13 AM2022-08-01T10:13:30+5:302022-08-01T10:13:50+5:30

इंग्रज निजाम या दोन्ही शत्रुंना एकत्र लोळवणाऱ्या धर्माजी मुंडे नाईकांची शौर्यकथा ग्रामस्थ जाणतात पण ती राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर का गेली नाही? असा सवाल भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केला.

History will be made if Vanjari-Dhangar come together Says BJP MLC Gopichand Padalkar | वंजारी-धनगर एकत्र आले तर इतिहास घडेल; आमदार गोपीचंद पडळकरांचा विश्वास

वंजारी-धनगर एकत्र आले तर इतिहास घडेल; आमदार गोपीचंद पडळकरांचा विश्वास

googlenewsNext

बीड - आपलं सरकार आहे. माझे वंजारी बांधव राजकीय प्रगल्भ आहेत. धनगर सध्या राजकीय हिस्सेदारी मागत आहेत. प्रस्थापितांचा जुलमाला गाढायचं असेल तर आपण सोबत येऊ. आपण सोबत आलो की इतिहास घडतो याची साक्ष इतिहास पानापानावर देतो. त्याची पुनरावृत्ती नक्कीच होईल असा विश्वास भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. 

पडळकर म्हणाले की, नवसाजी नाईकांनी पैनगंगा भागात आपलं राज्य चालवलं. या नदीवरच्या ईसापूर  धरणाला 'आद्यक्रांतीवीर नवसाजीराजे नाईक' नाव द्यावं आणि वंजारी विरांच्या सन्मानासाठी परळी अहिल्यानगर एक्सप्रेसला 'धर्माजीराजे मुंडे एक्सप्रेस' नाव मिळावं. ही मागणी आता मान्य करवून घेऊ. परळी वैद्यनाथाची भूमि ही क्रांतीची, क्रांतीवीरांची भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, संतश्रेष्ठ भगवान बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाने उजळून निघालेली ही भूमी एका क्रांतीविराच्या लढ्याची साक्षी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच इंग्रज निजाम या दोन्ही शत्रुंना एकत्र लोळवणाऱ्या धर्माजी मुंडे नाईकांची शौर्यकथा ग्रामस्थ जाणतात पण ती राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर का गेली नाही? शालेय पाठ्यपुस्तकांचा ,विद्यापीठांचा संशोधनाचा विषय माझा वंजारी वीर का होत नाही? याला कारण आहे प्रस्थापितांच्या मनात असलेली आपली दहशत. एकाच वेळी रामोशी, कोळी, वंजारी, धनगर, भिल्लांनी निजामाविरुद्ध बंड पुकारलं. मराठवाडा मुक्तीसंग्रामातल्या या जातींचा कधी उल्लेख होतोय का? नाही होत कारण या सर्व जातींनी खास करुन वंजारी-धनगरांनी एकत्र लढा दिला. नवसाजी नाईक आणि धर्माजी नाईक एकत्र लढले हे जर वंजारी धनगरांना कळलं तर वर्तमानात सुद्धा हे लोक एकत्र लढतील. प्रस्थापितांच्या गढ्या, कारखाने, बाजारसमितीच्या सत्ता हिसकावतील याची दहशत यांना आहे असा टोला पडळकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. 

त्याचसोबत प्रस्थापितांनी त्यांचे कोळशे सुर्यासारखे रंगवले आणि आमचे हिरे खाणीत फेकले. आता हे होणार नाही. आम्ही आमच्या वीरांना डोक्यावर घेऊन नाचू. वंजारी धनगर एकीचा नारा बुलंद करु. निजाम आणि इंग्रजांच्या बुंदकी आणि तोफगोळ्यांना तलवारीच्या पात्यावर चिरणारी लोक आहोत आपण. कुठल्या तरी टेकूजीरावानं यावं आणि दरडवून ह्यांव कर आणि त्यावं कर सांगावं याचे दिवस गेलेत असंही पडळकरांनी सांगितले. 

Web Title: History will be made if Vanjari-Dhangar come together Says BJP MLC Gopichand Padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.