केजमध्ये दहा व्यापाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:17+5:302021-05-29T04:25:17+5:30
लॉकडाऊनमध्ये दुकाने ठेवली उघडी केज : शहरात लॉकडाऊनच्या काळात चालू असलेल्या दहा दुकानदारांविरुद्ध महसूल व नगर ...
लॉकडाऊनमध्ये दुकाने ठेवली उघडी
केज : शहरात लॉकडाऊनच्या काळात चालू असलेल्या दहा दुकानदारांविरुद्ध महसूल व नगर पंचायतच्या पथकाने दंडात्मक कारवाई करत २९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तसेच केज शहरात कडक लॉकडाऊन राबविण्यात येत आहे. असे असतानाही काही व्यापारी एक शटर उघडून दुकाने चालू ठेवत असल्याचे निदर्शनास आले. प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस यांच्या उपस्थितीत महसूल प्रशासन व नगर पंचायत समितीच्या पथकाने गुरुवारी कारवाईची मोहीम राबविली. शहरातील शेख मतीन पाशा, विजय स्टील सेंटर, सागर फॅब्रिकेशन, गणेश स्टील सेंटर, नेहरकर वैजनाथ, बालाप्रसाद भुतडा, अत्तार पाशा शेख, शेख रसूल, तांबोळी अशफाक यांनी आस्थापना चालू ठेवल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्या पाचजणांवर दंडात्मक कारवाई करत २९ हजार १०० रुपयाचा दंड वसूल केला. प्रभारी तहसीलदार लक्ष्मण धस, नगरपंचायतचे स्वच्छता निरीक्षक असद खतीब, आयुब पठाण, सय्यद आतिक, शेख आझाद आदींनी ही कारवाई केली.
===Photopath===
270521\2242deepak naikwade_img-20210527-wa0031_14.jpg