गेवराईत उघड तोंडाने विनाकारण फिरणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:07+5:302021-05-08T04:36:07+5:30
गेवराई : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लाॅकडाऊन लागू केला आहे. शुक्रवारी शहरात विनामास्क ...
गेवराई : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक लाॅकडाऊन लागू केला आहे. शुक्रवारी शहरात विनामास्क तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पाेलीस विभाग व नगर परिषदेने संयुक्त कारवाई केली. दिवसभरात ९८ जणांकडून २४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात दुचाकीवर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ८५ व्यक्तींना २२ हजार रुपये दंड आकारण्यात आला, तर विनामास्क फिरणाऱ्या १३ जणांना २ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, सपोनि प्रफुल्ल साबळे, गणेश नांगरे, अमोल खटाने, नारायण खटाने, हनुमान जावळे, शरद बहिरवाळ, न.प.चे नानासाहेब कटारनवरे, भागवत येवले, ज्ञानेश्वर सौंदरमल, राजू बागवान, प्रकाश मानेसह अनेक जण उपस्थित होते. या कडक कारवाईमुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.
( शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलीस व नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचा फौज फाटा )
===Photopath===
070521\20210507_114352_14.jpg