पात्रुडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:30 AM2021-03-14T04:30:10+5:302021-03-14T04:30:10+5:30
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पात्रुड ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या वतीने शनिवारी पात्रुड येथे विनामास्क फिरणाऱ्या ...
: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पात्रुड ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या वतीने शनिवारी पात्रुड येथे विनामास्क फिरणाऱ्या व प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला.
ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने मेन रोडवर व गावात विना मास्क फिरणाऱ्या प्रवास करणाऱ्या व्यक्तींना समज देत व दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच जनजागृती करण्यात आली. ग्रामपंचायतच्या वतीने मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. ग्रामीण ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, ए. एस.आय. सुनील आईटवार, मिसाळ, चव्हाण, कदम, पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहने अडवून दंड वसूल करण्यात आला. पात्रुड ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी गणेश गायकवाड व कर्मचारी यांनी दंड वसूल करण्यास मदत केली. दंडात्मक कारवाईमुळे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांमध्ये धावपळ झाली.
===Photopath===
130321\purusttam karva_img-20210313-wa0045_14.jpg
===Caption===
पात्रुडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.