गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:34 AM2021-05-10T04:34:30+5:302021-05-10T04:34:30+5:30
रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी बीड : तालुक्यातील नेकनूर ते नांदूर घाट या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे ...
रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी
बीड : तालुक्यातील नेकनूर ते नांदूर घाट या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, दुचाकीस्वारांना मणक्याचे आजार जडण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सात्राचे सरपंच शाहू खोसे यांनी केले आहे.
नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन
बीड : राज्यात कोरोनाच्या संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रक्तसाठा कमी झाला आहे. रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी चौसाळा सर्कल परिसरात जिओ जिंदगीच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन विविध गावांमध्ये करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यास ग्रामस्थांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्लास्टिकमुळे नाल्या तुंबल्या
बीड : प्लास्टिक वापरासाठी बंदी असतानाही बीड व परिसरातील गावांमध्ये अजूनही सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या प्लास्टिकच्या पिशव्या गटारींमध्ये जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी करून नगरपरिषदेने नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण
बीड : जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचा कडबा भिजला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान, पावसाचा अंदाज मागील आठवड्यात हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन शेतातील कडबा व इतर साहित्य झाकून ठेवावे. जेणे करून नुकसान होणार नाही, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.