वेतन थकल्यामुळे आश्रमशाळेच्या शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:51+5:302021-08-27T04:36:51+5:30

बीड : संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी (ता. पाटोदा) येथील शिक्षकांचे आठ महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे शिक्षकांच्या ...

Holding of Ashram school teachers due to salary fatigue | वेतन थकल्यामुळे आश्रमशाळेच्या शिक्षकांचे धरणे

वेतन थकल्यामुळे आश्रमशाळेच्या शिक्षकांचे धरणे

Next

बीड : संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी (ता. पाटोदा) येथील शिक्षकांचे आठ महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे शिक्षकांच्या वतीने समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा वडझरी या ठिकाणी शिक्षक व कर्मचारी राहुल थिटे, अशोक सानप, मच्छिंद्र आंधळे, प्रदीप नेवळे, कालिदास वनवे, दीपक बांगर, धनंजय सानप, संजय जायभाय, रेखा लोंडे यांचे आठ महिन्यांपासून वेतन थकले आहे. यासंदर्भात वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करूनही कार्यवाही केली जात नाही. या शाळेवर प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण औरंगाबाद यांनी बीड येथील सहआयुक्तांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत मंत्रालयीन स्तरावरून कार्यवाही झालेली नसल्यामुळे नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्याविरोधात तसेच आठ महिन्यांचे थकीत वेतन मिळण्यासाठी समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत यासंदर्भात कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Holding of Ashram school teachers due to salary fatigue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.