किसान सभेच्या वतीने शेतकरी कायद्याची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:27 AM2021-01-15T04:27:59+5:302021-01-15T04:27:59+5:30

शेतकरी संयुक्त कृती समितीने जाहीर केल्यानुसार माजलगांव तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी बचाओ कृती समितीच्या वतीने ...

Holi of Farmers Act on behalf of Kisan Sabha | किसान सभेच्या वतीने शेतकरी कायद्याची होळी

किसान सभेच्या वतीने शेतकरी कायद्याची होळी

Next

शेतकरी संयुक्त कृती समितीने जाहीर केल्यानुसार माजलगांव तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी बचाओ कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शेतकरी विरोधी तिन्ही कायद्याची होळी करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ. मुसद्दीक बाबा , कॉ .ॲड शेख याकुब . भाई ॲड. नारायण गोले यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर प्रचंड घोषणाबाजीत शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायद्याची होळी करण्यात आली.या प्रसंगी कॉ. विनायक चव्हाण, कॉ. सादेक पठाण , कॉ .शेषराव आबुज , रणजीत जाधव, कॉ. शेख समीर , कॉ . शफीक , कॉ . महारूद्र घेणे, कॉ. सुदर्शन हिवरकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Holi of Farmers Act on behalf of Kisan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.