राज्य सरकारच्या परिपत्रकाची शिवप्रेमींकडून होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:30 AM2021-02-14T04:30:48+5:302021-02-14T04:30:48+5:30

गृहविभागाने परिपत्रक काढून सूचना केल्या आहेत. त्यात दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. ...

Holi from Shivprem of state government circular | राज्य सरकारच्या परिपत्रकाची शिवप्रेमींकडून होळी

राज्य सरकारच्या परिपत्रकाची शिवप्रेमींकडून होळी

Next

गृहविभागाने परिपत्रक काढून सूचना केल्या आहेत. त्यात दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आठ ते नऊ महिने शासनाचा प्रत्येक नियम जनतेने पाळला. कडकडीत लॉकडाऊन पाळल्यानंतर मागील एक ते दोन महिन्यांपासून सर्व सुरळीत सुरू आहे. शाळा, कॉलेज सिनेमागृह सुरू करण्यात आले आहेत. राजकीय नेत्यांचे गावोगावी दौरे सुरू आहेत. त्यांच्या मोठ्या सभा होत आहेत. लग्न समारंभ मोठे होऊ लागले आहेत. प्रत्येक ठिकाणचा आठवडी बाजार तितक्याच मोठ्या गर्दीने भरत आहे. मोठमोठे आंदोलने होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या रॅली, सभा झाल्या. या सर्व कार्यक्रमापेक्षा शिवजयंती सर्वांची अस्मिता आहे. त्यामुळे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला कोणताही नियम, अटी लावू नये, अशी मागणी सौदागर जाधव, राजाभाऊ मुंडे, नाना मालदार, इरफान सय्यद, जगदीश आंधळकर, पप्पू नाळपे, अशोक जाधव रजनीकांत जाधव, अमोल जाधव आदींनी केली आहे.

Web Title: Holi from Shivprem of state government circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.