निराधारांच्या मंजुरी पत्राचे घरपोच वितरण - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:45+5:302021-07-16T04:23:45+5:30

धारूर : तालुक्यातील मंजूर झालेल्या संजय गांधी व श्रावणबाळ वृद्धापकाळ अनुदान योजना, निराधार वंचित वृद्ध, अपंग, विधवा साहाय्यता योजनेच्या ...

Home delivery of sanction letter to the destitute - A | निराधारांच्या मंजुरी पत्राचे घरपोच वितरण - A

निराधारांच्या मंजुरी पत्राचे घरपोच वितरण - A

Next

धारूर : तालुक्यातील मंजूर झालेल्या संजय गांधी व श्रावणबाळ वृद्धापकाळ अनुदान योजना, निराधार वंचित वृद्ध, अपंग, विधवा साहाय्यता योजनेच्या लाभार्थ्यांना घरपोहोच मंजुरीपत्र देण्याचा आगळा उपक्रम तालुका निराधार योजना समितीच्या सदस्यांनी राबविला. धारूर तालुका संजय गांधी व श्रावणबाळ, वृद्धापकाळ अनुदान योजना, निराधार वंचित वृद्ध, अपंग, विधवा साहाय्यता योजनेचे लाभार्थी वंचित होते. शासनाने तालुका निराधार योजना समिती नियुक्त करताच दोन बैठकांमध्ये पात्र अर्ज मंजूर करण्यात आले. झालेल्या बैठकीत मंजूर झालेले पत्र धारूर शहर, बोडखा, कासारी, चोंडी, धुनकवड, आंबेवडगाव, पहाडी पारगाव, चारदरी, सुरनरवाडी, कान्नापूर, इत्यादी गावांमध्ये जाऊन लाभार्थ्यांना घरपोच वाटप केले. लाभार्थ्यांना घरपोच पत्र मिळाल्याने त्यांच्या तहसील कार्यालयाच्या चकरा वाचणार आहेत. या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समितीचे अध्यक्ष बालासाहेब मायकर, सदस्य बंडू मस्के, अशोक तिडके, प्रदीप नेहरकर, बाबूराव शिनगारे, अशोक तिडके, बाळसाहेब कुरुंद, शिवाजी काळे, आदींनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार प्रकाश गोपड, वरिष्ठ लिपिक देवकते, लिपिक खरात व काळे यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य, गरजूंचा त्रास थांबावा म्हणून उपक्रम, निराधार व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेत अर्ज करणारे खरे गरजू असतात. त्यांना मंजुरी अर्जानंतर बँक खाते उघडणे इतर प्रक्रिया सोपी जावी यासाठी हा घरपोच मंजुरी पत्र वितरणाचा उपक्रम राबविला. प्रशासनाचे सर्व नियमांचे पालन करून आम्ही सर्व समिती सदस्य हा उपक्रम राबवीत असल्याचे या समितीचे सदस्य अशोक तिडके यांनी सांगितले.

Web Title: Home delivery of sanction letter to the destitute - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.