ग्रामउर्जातर्फे कोविड रुग्णांसाठी घरपोच ऑक्सिजन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:23+5:302021-05-20T04:36:23+5:30

ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा होणारा तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील गरजू रूग्णांची सोय व्हावी म्हणून ...

Home Energy Oxygen Service for Kovid Patients by Gramurja | ग्रामउर्जातर्फे कोविड रुग्णांसाठी घरपोच ऑक्सिजन सेवा

ग्रामउर्जातर्फे कोविड रुग्णांसाठी घरपोच ऑक्सिजन सेवा

Next

ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा होणारा तुटवडा यामुळे ग्रामीण भागातील गरजू रूग्णांची सोय व्हावी म्हणून ग्रामउर्जा संस्थेने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न केले. ज्याचा पहिला टप्पा म्हणून अमेरिका येथील विभा संस्थेकडून ५ मशीन सध्या रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मोठी झळ ग्रामीण भागाला बसली आहे. ग्रामीण भागात ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्ण दगावण्याचा आकडाही चिंताजनक आहे. वेळेवर ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था झाली तर अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. आरोग्य यंत्रणेवर तसेच रूग्णालयातील बेड उपलब्धतेवरील ताण कमी व्हावा, रूग्ण मृत्यूदर कमी व्हावा, या संकल्पनेतून ग्रामउर्जा संस्थेने ऑक्सीिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्धतेसाठी प्रयत्न केले. अमेरिकेतील विभा संस्थेकडून सहकार्य करण्यात आले. गरजू रुग्णांच्या नातेवाईकांनी संस्थेला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मशीन या सात लिटर क्षमतेच्या असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण त्या वापरु शकता असे संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

===Photopath===

190521\anil mhajan_img-20210519-wa0020_14.jpg

Web Title: Home Energy Oxygen Service for Kovid Patients by Gramurja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.