गैरहजर राहिलेल्या ८३ होमगार्डला ‘घरचा रस्ता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:10 AM2019-12-11T00:10:57+5:302019-12-11T00:11:30+5:30

निवडणूक कालावधिमध्ये सर्व होमगार्ड यांना कायमस्वरूपी दोन महिने कर्तव्यावर नेमण्यात आले होते. दरम्यान या कालावधीमध्ये गैरहजर राहिलेल्या होमगार्डची चौकशी करून ८३ जणांना घरचा रस्ता दाखवला आहे.

'Home road' to 4 missing guards | गैरहजर राहिलेल्या ८३ होमगार्डला ‘घरचा रस्ता’

गैरहजर राहिलेल्या ८३ होमगार्डला ‘घरचा रस्ता’

googlenewsNext

बीड : पोलिसांच्या खाद्याला-खांदा लावून काम करण्यासाठी होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होमगार्डची भरती देखील करण्यात आली आहे. निवडणूक कालावधिमध्ये सर्व होमगार्ड यांना कायमस्वरूपी दोन महिने कर्तव्यावर नेमण्यात आले होते. दरम्यान या कालावधीमध्ये गैरहजर राहिलेल्या होमगार्डची चौकशी करून ८३ जणांना घरचा रस्ता दाखवला आहे.
निवडणूक कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातून वाढीव बंदोबस्त मागवण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यात जवळपास ३०० पेक्षा अधिका होमगार्ड यांना विविध ठिकाणी बंदोबस्ताचे काम नेमून दिले होते. यावेळी सर्वांनी कर्तव्यावर हजर राहून पोलीस प्रशासनाच्या कामात मदत करण्याच्यासंदर्भात वरिष्टांनी सूचना देखील दिल्या होत्या, तसेच निवडणूक कालावधिमध्ये तयार करण्यात आलेल्या बंदोबस्त स्किममध्ये होमगार्ड याचा देखील समावेश केलेला होता. मात्र, गौरहजर राहिल्यामुळे इतरांवर या कामाचा भार आला. दरम्यान अशा कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या १०४ होमगार्डना अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी नोटीस देऊन १५ दिवसात खुलासा मागवला होता. त्यानंतर अनेकांनी खुलासा दिला, या खुलाशाची पडतळाणी करून १०४ पैकी १८ जणांचे खुलासे ग्राह्य धरण्यात आले व त्यांना पुन्हा सेवेची संधी देण्यात आली. तर ८३ जणांना होमगार्ड पदावरून १० डिसेंबरपासून ‘नारळ’ देण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेत असणाºया इतर ३ जणांनी राजीनामा दिल्याची देखील माहिती आहे.

Web Title: 'Home road' to 4 missing guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.