होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:18 AM2019-03-18T00:18:04+5:302019-03-18T00:20:32+5:30
ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले.
बीड : ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले. होमिओपॅथी विद्यार्थ्यांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे देशपातळीवर हे विद्यार्थी चमकत आहेत. बीडचा विद्यार्थी देशपातळीवर काम करतो याचे समाधान असून मानवाच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा वापर व्हावा असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्यालयाच्या वतीने रविवारी पदवी पदव्युत्तर व डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मेळावा व राष्टÑीय सेमिनारचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिष्ठाता डॉ.डी.जी.बागल, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.प्रिया महिंद्रे, डॉ.अजित फुंदे, डॉ.बाळासाहेब पवार, डॉ.मंगेश जतकर, डॉ.प्रताप भोसले, डॉ.अन्वर अन्सारी, डॉ.एस. प्रविणकुमार, डॉ.संतोष महानोर, डॉ.अजित कुलकर्णी माजी विद्यार्थ्यांपैकी डॉ.राजेंद्र मुनोत आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. राजेंद्र मुनोतसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.सुधीर निकम यांनी केले. डॉ.गणेश पांगारकर यांनी आभार मानले. प्रारंभी मान्यवरांचे स्वागत डॉ.महेंद्र गौशाल, प्राचार्य अरूण भस्मे, डॉ.गणेश पांगारकर, डॉ.भागवत मोटे, डॉ.गफर अली, डॉ.अजय कुलकर्णी, डॉ.नितीन राऊत यांनी केले.
संस्थेच्या वतीने आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते डॉ.पटेल, डॉ. पवार, डॉ. विजयकर, डॉ.फुंदे, डॉ. भोसले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अरूण भस्मे यांनी केले.
हे सर्व काकूंमुळेच शक्य झाले - क्षीरसागर
आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, स्व.काकूंनी डिप्लोमा कोर्सच्या माध्यमातून सुरूवात केलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयात आता पीएच.डी.पर्यंतचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. जवळपास ४ हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण करून आपले व्यवसाय सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात होमिओपॅथीला मान्यता मिळावी यासाठी आपण सातत्याने शासनदरबारी प्रयत्न केले त्यामुळेच आज हजारो विद्यार्थी या विषयांमध्ये नवनवीन संशोधनाचे मार्ग शोधू लागले आहेत. हे सर्व स्व.काकूंमुळेच शक्य झाल्याचे आ.क्षीरसागर म्हणाले.
संघटीत व्हा
कुलगुरू डॉ.गिरीष पटेल म्हणाले की, डॉ.अरूण भस्मे एक कुशल आणि शिस्तबध्द प्राचार्य असून माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून संवाद साधता यावा आणि या माध्यमातून प्रत्येकाची यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचावी हा मुळ उद्देश त्यांचा आहे. होमिओपॅथीला नवी ओळख निर्माण करण्यासाठी अनेकांचे योगदान आहे त्यात डॉ.भस्मे यांचा वाटा आहे. आत्मविश्वाच्या जोरावर एक विद्यार्थी आपले नाव उंचावू शकतो हे या सेमिनारच्या माध्यमातूनच कळते. होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी आता संघटीत होऊन या पॅथीला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले.