बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या ५१ महिलांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:01+5:302021-07-18T04:24:01+5:30

राजश्री मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला परळी : ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांना अधिकाधिक अर्थसाहाय्य व उद्योगांना चालना ...

Honor to 51 women who have done remarkable work through self help groups | बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या ५१ महिलांचा गौरव

बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या ५१ महिलांचा गौरव

Next

राजश्री मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला

परळी : ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गटांना अधिकाधिक अर्थसाहाय्य व उद्योगांना चालना देऊन परळी मतदारसंघातील महिलांचे सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी आम्ही पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सदैव प्रयत्नशील आहोत. यासाठी महिलांना आवश्यक असलेली सर्वतोपरी मदत आपण करणार असल्याचे राजश्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

परळी तालुक्यातील संगम येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महिला स्वयंसाहाय्यता बचत गटांमार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या ५१ महिलांचा राजश्री मुंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संगम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या विविध विकासकामांसह येथील सभागृहाचे मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बचत गटांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा राजश्री मुंडेंच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून, तसेच मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संगमच्या सरपंच वच्छलाबाई कोकाटे, उपसरपंच गंगाधर नागरगोजे, माऊली तात्या गडदे, व्यंकट हरणावळ, सचिन हरणावळ, राजाभाऊ गिराम, युनूस बेग, अनिल कामाळे, रुक्षराज नागरगोजे, हनुमंत कामाळे, देवीदास रोडे, पोलीस पाटील पांडुरंग रोडे, वसंत गायकवाड, विकास रोडे, प्रभाकर गिराम, मुक्तेश्वर गिराम, सुरेश मुंडे यांच्यासह गावातील महिला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रमाचे नियोजन तथा आयोजन रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले होते.

कुणाल मुंडे, शोभा विरगट, शिल्पा मुपकलवार, वंदना गोदाम, नीता गायकवाड, कविता संसारे, मनीषा वाघमारे, प्रभावती कराड, मंगल कडबाने, सीमा भद्रे, अनिता जाधव, वैशाली मुंडे, अकिलाबी सय्यद, आशा गुट्टे, वसुधा आघाव, करुणा शिंदे, ज्योती केंद्रे, विमल जाधव, कांता मुंडे, गोकर्णा शिंदे, मंगल मुंडे, रोहिणी खोडवे आदींचा राजश्री मुंडेंच्या हस्ते गौरव संपन्न झाला. कोरोनामुळे विधानसभा निवडणूक संपल्यानंतर गावांमध्ये भेटी देऊन आभार मानता आले नाही. येत्या काळात आपण मतदारसंघातील महिलांचे आभार मानण्यासाठी दौरा करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Honor to 51 women who have done remarkable work through self help groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.