धारूर तालुक्यातील बारा गावांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:08+5:302021-08-20T04:38:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेत यशस्वी काम करून पुढे समृद्ध गाव स्पर्धेत यशस्वी ...

Honor of twelve villages in Dharur taluka | धारूर तालुक्यातील बारा गावांचा सन्मान

धारूर तालुक्यातील बारा गावांचा सन्मान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेत यशस्वी काम करून पुढे समृद्ध गाव स्पर्धेत यशस्वी काम करणाऱ्या तालुक्यातील १२ गावांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

येथील पंचायत समिती सभागृहात पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा २०२१- २०२२ समृद्धीच्या वाटेवरील गावांचा सन्मान सोहळा झाला. यावेळी या कार्यक्रमास जि. प. चे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, ज्ञान प्रबोधिनीचे प्रसाद चिक्षे, गटविकास,अधिकारी तुरुकमारे, वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवडे, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, उमेदच्या तालुका व्यवस्थापक कल्पना लंगोटे आदी उपस्थित होते. यावेळी दहा प्राथमिक मुद्यांवर जलव्यवस्थपन, पीकनिहाय सर्वेक्षण, विहीर व बोअरवेल आदींचा समावेश होता.

यावेळी नामदेव नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले. दादासाहेब वानखेडे यांनी या स्पर्धेत प्रत्यक्ष काम करून शाश्वत विकास साधावा, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ठोंबरे यांनी केले. तालुका समन्वयक नितीन पाटुळे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------

या गावांचा सन्मान

उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यातील हिंगणी, अंजनडोह, मोरफळी, निमला, जायभायवाडी, सुरनरवाडी, हसनाबाद देवठाना, व्हरकटवाडी, सिंगनवाडी, आम्ला, आंबेवडगाव या बारा गावांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

----

निवडलेला निकष राज्याचा पॅटर्न ठरावा

यावेळी प्रसाद चिक्षे यांनी ‘स्वप्नातलं गाव उभे करणारा हा तालुका असून समृद्ध गावे निर्माण होत असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. चांगुलपणाची ताकदीवर विश्वास ठेवून जलसंधारण बरोबर मनसंधारण करा. नियोजन पक्के असेल तर यश मिळणारच. समृद्ध गावामधील असा एखादा निकष निवडा, तो राज्यभर पॅटर्न ठरला पाहिजे, असे ते म्हणाले.

-------

190821\img-20210818-wa0060.jpg

समृद्दी कडे वाटचाल करणाऱ्या धारूर तालूक्यातील बारा गावाचा सन्मान

Web Title: Honor of twelve villages in Dharur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.