उपक्रम शुभारंभाचा मान महिला कामगारांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:33 AM2021-05-14T04:33:31+5:302021-05-14T04:33:31+5:30
शिरूर कासार : शहरात माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत नगरपंचायतीने उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीचे गुरुवारी सफाई कामगार महिलांच्या हस्ते उद्घाटन ...
शिरूर कासार : शहरात माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत नगरपंचायतीने उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीचे गुरुवारी सफाई कामगार महिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला सफाई कामगार चतुरा शिंदे व राहीबाई चांदणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची संकल्पना मुख्याधिकारी किशोर सानप यांनी प्रत्यक्षात व स्वत: उपस्थित राहून पूर्ण केली. यावेळी वरिष्ट लेखापाल चंद्रकांत दामोधर, राहुल देशमुख, सागर कुंभार, कौसर शेख, मन्सुर शेख उपस्थित होते.
शिरूर नगर पंचायतने सुंदर व स्वच्छ शहर या उपक्रमात सहभाग घेतला असल्याने स्वच्छतेबरोबर अन्य वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. जागोजागी बोलक्या भिंती संदेश देण्याचे काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्यालयाजवळच माणुसकीची भिंत असून, त्यावर नको असणारे कपडे आदी सामान नागरिकांनी ठेवायचे व ज्यांना हवे असेल तर यांनी ते नेऊन त्याचा वापर करायचा आहे. गुरुवारी शुभारंभालाच अनेकांनी कपडे आणून ठेवल्याचे दिसून आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी मनसूर शेख, संजय गायकवाड, सुनील शेटे, बालाजी कदम, गणेश गोरमाळी, अनिल जगताप, भाऊसाहेब मोरे, गणेश कातखडे आदींनी परिश्रम घेतले.
शहरातील नागरिकांनी नको असलेले कपडे, अंथरूण, पांघरूण, सतरंजी, चादरी साहित्य या भिंतीवर ठेवून गरजवंतांसाठी मदतीचा हात द्यावा तसेच ज्यांना हवे असेल त्यांनी घेऊन जावे, असे आवाहन मुख्याधिकारी सानप यांनी केले आहे.
कुणीतरी याचा वापर करणार ही गोष्ट लक्षात घेऊन कपडे स्वच्छ करूनच ठेवल्यास अधिक चांगले असेही ते म्हणाले.
===Photopath===
130521\img_20210513_125034_14.jpg