वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून आकांक्षांची क्षितीजे पादक्रांत करावी : कुलगुरू अशोक ढवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 08:15 PM2021-01-19T20:15:31+5:302021-01-19T20:16:38+5:30

कृषी महाविद्यालय,अंबेजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

The horizons of aspirations should be crossed through reading culture: Vice Chancellor Ashok Dhavan | वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून आकांक्षांची क्षितीजे पादक्रांत करावी : कुलगुरू अशोक ढवण

वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून आकांक्षांची क्षितीजे पादक्रांत करावी : कुलगुरू अशोक ढवण

Next

अंबाजोगाई : येथील कृषी महाविद्यालय,अंबेजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून वनामकृविचेचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण हे होते.तर उद्घाटक म्हणून आ नमिता मुंदडा ह्या होत्या.यावेळी व्यासपीठावर  प्रमुख अतिथी म्हणून वनामकृविचे माजी कुलसचिव डाॅ.दिगंबरराव चव्हाण,उषाताई ढवण,माजी सरपंच वसंतराव मोरे, वैजेनाथ देशमुख, सुदाम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांकडून शिवार पाहणी व परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी व्यासंगी आणि अभ्यासू असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ते साध्य करण्यासाठी त्या दिशेने योग्य ती पावले टाकली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीचे जतन करावे, कृषीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आकांक्षाची क्षितीजे पादक्रांत करण्यासाठी अविरत ग्रंथ वाचन करावे, असेही ते म्हणाले. यावेळी आ.नमिता मुंदडा यांनी जागतिक पर्यावरणाची योग्य काळजी घेण्याचे सामर्थ्य हे कृषीच्या विद्यार्थ्यांत आहे असे गौरवोद्गार काढले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आपल्या ज्ञानाचा वापर करून तसेच सामाजिक जाणिवेतून कृषी युवकांनी सामाजिक उत्तरदायित्व जोपासावे असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात संभाजी हनुमंत गवळी,सुरज श्रीराम पोकळे,गणेश मधुकर कराड,पवन रामराव ठोंबरे,अनिल देविदास पवार,भागवत बबन जायभाये,प्रियंका शिवाजी नखाते,भक्ती विजय पवार,सोनाली शिवाजी जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून गौरवचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून यथोचित गौरव करण्यात आला. या सोबतच सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांचा कोरोना काळात गरजूंना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश रेवले, प्रा.डाॅ.नरेशकुमार जायेवार यांनी तर आभार डाॅ.दीपक लोखंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डाॅ.अरूण कदम, डाॅ.प्रताप नाळवंडीकर, डाॅ.बसवलींगआप्पा कलालबंडी,प्रा.सुनिल गलांडे,डॉ.सुहास जाधव,डॉ नरेंद्र कांबळे,डॉ.नरेशकुमार जायेवार,डाॅ.विद्या तायडे,डाॅ.योगेश वाघमारे,अनंत मुंढे, सुनील गिरी,मनिषा बगाडे,माया भिकाणे, भास्कर देशपांडे,यादव पाटील,सय्यद इरफान,पुजा वावरगिरे,स्वप्नील शिल्लार आदींनी प्रयत्न केले.

Web Title: The horizons of aspirations should be crossed through reading culture: Vice Chancellor Ashok Dhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.