मिरवट येथे ‘सीआरए’ पद्धतीने फळबाग लागवड प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:59 AM2021-03-13T04:59:15+5:302021-03-13T04:59:15+5:30

घाटनांदूर : सातत्याने कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा जगविणे अवघड होत आहे. यासाठी सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब ...

Horticulture training at CRA method at Mirwat | मिरवट येथे ‘सीआरए’ पद्धतीने फळबाग लागवड प्रशिक्षण

मिरवट येथे ‘सीआरए’ पद्धतीने फळबाग लागवड प्रशिक्षण

googlenewsNext

घाटनांदूर : सातत्याने कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फळबागा जगविणे अवघड होत आहे. यासाठी सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब करून रोपांची लागवड केल्यास दुष्काळी परिस्थितीत फळबाग जगविण्यासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार असल्याचे मत पोकरा प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी व्यक्त केले.

कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) म्हणजेच हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मिरवट येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक प्रशिक्षण आयोजित केले होते.

१) शेतीशाळा प्रशिक्षक राहुल मुंडे यांनी पारंपरिक फळबाग लागवड पद्धतीमुळे होणारे तोटे शेतकऱ्यांना समजावून सांगितले आणि सीआरए तंत्रज्ञानाचा अवलंब फळबाग लागवडीसाठी करण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक संतोष तेलंग्रे, भरत इंगळे, पंडितराव भदाडे, रतन इंगळे, दत्ता भदाडे, रोहन भदाडे दीपक भदाडे, अंगद भदाडे, विठ्ठल बोंबले, ज्ञानोबा बोंबले, अनंत बोंबले, सुभाष इंगळे, धनंजय इंगळे आदी शेतकरी उपस्थित होते.

२) प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी पंडितराव भदाडे यांच्या शेतात दोन फूट लांब, दोन फूट रुंद, दोन फूट खोल खड्डा करून त्या खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर चार इंच व्यासाचे तीन फूट लांब पाईप उभे केले. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे बायोमिक्स जैविक औषध चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून खड्डा शेणखत, पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व मातीच्या मिश्रणाने दीड फूट भरला.

३) तेथे नारळाचे झाड लावून उर्वरित खड्डा मातीने भरून घेतला. त्यानंतर खड्ड्यामध्ये उभ्या केलेल्या सर्व पाइपमध्ये अर्धा फूट कुजलेले शेणखत व रिक्त दीड फूट जागेमध्ये जमीन पातळीपर्यंत वाळू भरली. त्यानंतर पाइप हळूवारपणे वर ओढून बाहेर काढले. पाइप काढल्याने चारही कोपऱ्यांत वाळूचा दीड फूट खोलीचा ‘कॉलम’ तयार होऊन रोपांना दिलेले पाणी प्रथम चार कॉलम्समध्ये शोषले जाते.

४) कॉलम पाण्याने पूर्ण भरला की आजूबाजूला पाणी झिरपण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे मुळांच्या परिसरास तत्काळ ओलावा मिळतो, सिंचनाची कार्यक्षमता वाढते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, मोकाट सिंचनापेक्षा कमी पाणी लागून जलसंवर्धन होते. तसेच शेणखतामुळे पाणी धरून ठेवले जाते, मुळांना अन्नद्रव्ये मिळतात, रोपांची वाढ झपाट्याने होऊन सशक्त झाड निर्माण होते असे येळकर म्हणाले.

===Photopath===

110321\narshingh suryvanshi_img-20210311-wa0024_14.jpg

===Caption===

मिरवट येथे पोकरा प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी  प्रात्यक्षिक करून दाखवले

Web Title: Horticulture training at CRA method at Mirwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.