डेंग्यू, चिकनगुनिया रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:52+5:302021-08-21T04:37:52+5:30
आष्टी तालुक्यातील सर्व गावांमध्ये साथरोग प्रतिबंधात्मक मोहिमेत कंटेनर सर्वेक्षण, अबेटिंग, पाणी नमुने तपासणीसाठी पाठवणे, तसेच सर्व ...
आष्टी तालुक्यातील सर्व गावांमध्ये साथरोग प्रतिबंधात्मक मोहिमेत कंटेनर सर्वेक्षण, अबेटिंग, पाणी नमुने तपासणीसाठी पाठवणे, तसेच सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत, तसेच लोकांमध्ये साथीच्या आजारांबाबत जनजागृतीसह प्रत्यक्ष सर्वेक्षणा सुरुवात करण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे, डॉ. प्रसाद वाघ, डाॅ. अनिल आरबे, डाॅ. नितीन राऊत, डॉ. टोडेवाड, यांच्यासह आरोग्य कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
लक्षणे
अचानक तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडास कोरड पडणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव.
उपचार
डेंग्यू तापावर निश्चित उपचार नसल्याने लक्षणांनुसार उपचार केले जातात. संपूर्ण विश्रांती, ताप, चमक, औषधे या चार संजीवनींचा वापर गंभीर स्वरूपाची लक्षणे असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करा.
प्रतिबंधक उपाययोजना
घराच्या आवारातील पाणी साचून राहणाऱ्या निरुपयोगी वस्तू नष्ट करा. उदा. टायर, डबे, बादल्या, माठ, रांजण, इत्यादी. घराभोवती परिसर स्वच्छ ठेवा, मोठ्या पाण्याच्या साठ्यात गप्पी मासे सोडा, लहान बालकांना दिवसा मच्छरदाणीत झोपवा, ग्रामपंचायत नगरपंचायतमार्फत कीटकनाशक औषध फवारणी करा, पाण्याचे साठे, भांडे दर आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामे, तसेच स्वच्छ कोरडे करा, दिवसा डास चावतात, असे लक्षात आल्यास घर व परिसरातील डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन ते नष्ट करा, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा.