कपाशीसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना कितपत यशस्वी ठरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:28 PM2018-05-16T23:28:11+5:302018-05-16T23:28:11+5:30

पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे.

How successful is the concept of 'One Village One Variety' concept for cotton? | कपाशीसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना कितपत यशस्वी ठरणार?

कपाशीसाठी ‘एक गाव एक वाण’ संकल्पना कितपत यशस्वी ठरणार?

googlenewsNext
ठळक मुद्देकपाशीच्या माध्यमातून चांगल्या उत्पन्नासाठी मत-मतांतरे

अनिल भंडारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर मागील वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता आगामी हंगामाचे वेध लागले असून नगदी पीक असल्याने शेतकºयांचा कल पुन्हा कपाशीकडेच असल्याचे दिसत आहे.

कपाशीच्या माध्यमातून शेतकºयांना चांगले उत्पन्न घेता यावे म्हणून कृषी क्षेत्रातील जाणकारांनी एक गाव एक वाण संकल्पना मांडली आहे. यातून पीक व्यवस्थापन वेळीच करणे सुलभ होऊ शकते, असे त्यांचे मत असून दुसरीकडे हा प्रयोग राबविणे कठीण असल्याचे कृषी विभागातील अधिकाºयांना वाटते. त्यामुळे हा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल याकडे लक्ष लागले आहे.

कापूस पिकाची उत्पादकता कमी होण्याची कारणे
कोरडवाहू क्षेत्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रावर कपाशीची लागवड, हलकी, मध्यम, भारी सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करणे, एकाच क्षेत्रामध्ये अनेक वाणांची लागवड करणे, सेंद्रिय खतांचा अभाव, रासायनिक खतांची चुकीची व अवेळी मात्रा देणे, आंंतरमशागत चुकीच्या पध्दतीने करणे, कीड व रोग नियंत्रण करतांना औषधांची चुकीची निवड करणे, हवामानात सतत होत असलेले बदल आणि पावसाची अनियमितता, हेक्टरी झाडांची अपूरी संख्या, सिंंचनाचा अपुरा आणि अयोग्य वापर, सुक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा अपुरा वापर.

उपाययोजना
या कारणांसह इतर घटाकांमुळे कापूस पिकाची उत्पादकता वरचेवर कमी कमी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे यासाठी बीड जिल्ह्यात काय करता येईल यावर एक अभ्यास करण्यात आला. जिल्ह्यातील जमीन व पाणी याचा अभ्यास केला असता ‘एक गांव एक वाण’ ही संकल्पना पुढे आली. कपाशीच्या कोणत्याही वाण अथवा जातीवर शेतकºयांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त वाण शेतात लावतात. परिणामी फायदे होण्याऐवजी तोटेच पदरी पडतात. यासाठी एक गाव एक वाण ही संकल्पना राबविण्याची गरज असल्याचे कृषी क्षेत्रातील काही जाणकारांनी सांगितले. अक्षयतृतीयेपासून नांगरटीच्या क्षेत्रामध्ये मोगडा-पाळीच्या कामांना वेग येतो. या कालावधीत लग्नसराईचा धुमधुडाका होता. त्यामुळे मंदावलेल्या शेतीकामांना आता वेग आला आहे. पेरणीसाठी जमीन तयार करतांना कमीत कमी कुळवाच्या तीन पाळ्या दिल्या जातात. शेवटची पाळी देखील ठरलेली असते. ही पाळी दक्षिणोत्तर घातली जाते. कारण खरीपाची पेरणी ही पूर्व-पश्चिम करावयाची असते.

कपाशी आहे तरच चलन
मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्टÑामध्ये नगदी पीक म्हणून कापूस लागवडीकडे कल वाढला आहे. उसानंतरचे नगदी पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहिले जाते. कापसाच्या उत्पादनावर पुढील वर्षाचे व्यवहार ठरतात. कापसाचे पैसे आले की, लगीनसराई जोरात होते. दैनंदिन व्यवहारामध्ये चलन फिरते राहते. इतर पिकांची उत्पादकता कमी असल्यामुळे तत्काळ पैसा देणारे पीक म्हणून कपाशीचे महत्त्व मोठे आहे.

शेतकरी तयार होतील का?
मागील वर्षी अकोला, अमरावती जिल्ह्यात कृषी विभागाने पुढाकार घेत २५० एकरात एक गाव एक वाण ही संकल्पना राबविली. संबंधित कंपनीच्या माध्यमातून कीड व्यवस्थापन करण्यात आले. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आले. असे प्रयोग बीड जिल्ह्यात होण्यासाठी शेतकºयांची मानसिकता तयार होईल का ? हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. असा प्रयोग यापूर्वी जिल्ह्यात यशस्वी ठरला नव्हता.

असा प्रयोग राबविणे कठीण
एक गाव , एक वाण हा प्रयोग जिल्ह्यात राबविणे कठीण आहे. पाच- सात वर्षांपूर्वी असा प्रयत्न जिल्ह्यात झाला होता. काही कंपन्यांनी उत्पादीत मालाची हमी घेतली होती. मात्र उत्पादनाच्या दर्जाबाबत शाश्वती नाही. तसेच या प्रयोगामुळे एकाच वाणाची मागणी होईल यातून काही कंपन्या हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतील. यातून अनिष्ट प्रकार होतील. त्यापेक्षा शेतकºयांनी कमी कालावधीचा कापूस लावणेच उत्तम ठरेल.
- डी. बी. बिटके, कृषी विकास अधिकारी, जि. प. बीड.

विविध वाणावर भर
नेमके कोणत्या वाणातून भरघोस उत्पन्न मिळेल याचा नेम नसल्याने शेतकरी एकापेक्षा जास्त वाण लावतात.
एखाद्या वाणातून उत्पन्न कमी मिळाले अथवा नुगकसान झाले तर दुसºया वाणातून त्याची कसर भरण्यासाठी अशी लागवड ते करतात.

Web Title: How successful is the concept of 'One Village One Variety' concept for cotton?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.