बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवी हक्क अभियानचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:18 AM2017-12-11T01:18:01+5:302017-12-11T01:18:52+5:30
जागतिक मानवी हक्क अभियान दिनानिमित्त रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवी हक्क अभियानच्या बीड शाखेतर्फे महाधरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जागतिक मानवी हक्क अभियान दिनानिमित्त रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मानवी हक्क अभियानच्या बीड शाखेतर्फे महाधरणे आंदोलन करण्यात आले.
गायरान जमिनीचा कायदा करून ती कष्टकºयांच्या नावे करावी, अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड नुसार कारवाई करून मातंग व उपजातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, भूमिहीन, विधवा, परित्यक्त्या, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय महामंडळांचे सर्व कर्ज माफ करावे, ०-१८ वयोगटातील मुला-मुलींना सक्तीचे दर्जेदार मोफत शिक्षण द्यावे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त १ आॅगस्ट रोजी शासकीय सुटी जाहीर करावी, वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेतील मयतांना १५ लाखांची मदत द्यावी, कारखान्याचे एम.डी. व अभियंत्यांवर गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद आव्हाड, मराठवाडा प्रमुख मधुकर लोंढे, उपाध्यक्ष अमोल कांबळे, राज्य उपाध्यक्ष अशोक सोनवणे, राज्य सदस्य रामेश्वर चांदणे, युवा जिल्हाध्यक्ष दीपक थोरात, महिला आघाडीच्या अलका ताकतोडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.