पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:57 AM2019-01-30T00:57:55+5:302019-01-30T00:58:21+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन कुºहाडीचे घाव घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने मंगळवारी (२९ जानेवारी) सुनावली.

The husband is the wife of the murderer | पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चारित्र्यावर संशय घेऊन कु-हाडीचे घाव घालून पत्नीचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या पतीला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने मंगळवारी (२९ जानेवारी) सुनावली.
शहरातील नरसोबा नगर, धानोरा रोड भागात उत्तम मारोती भंडारे यांचे कुटुंब राहते. १४ ते १५ जून २०१५ रोजीच्या रात्री उत्तम भंडारे याने पत्नी रुख्मिणीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती झोपेत असताना तिच्या डोक्यात, तोंडावर आणि मानेवर कु-हाडीने गंभीर जखमी करुन तिचा खून केला. याप्रकरणी रुख्मिणीबाई हिचा मुलगा बाळू उत्तम भंडारे याच्या फिर्यादीवरुन उत्तम भंडारे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक वाय. व्ही. बारवकर यांनी सखोल तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण बीड सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अति. सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्यावतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील बी.एस.राख यांनी सहकार्य केले. याप्रकरणी न्यायालय पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि आर.बी. मोरे, हेकॉ एस. डी. जाधव यांनी काम पाहिले.
या प्रकरणी मयताचा मुलगा, सुन व लहान नातु या साक्षीदारांसहित इतर साक्षीदारांचे जबाब, आरोपीच्या अंगावरील कपडे व जप्त करण्यात आलेली कु-हाड, त्यावर आढळलेले रक्ताचे डाग व इतर परिस्थितीजन्य पुराव्यांचे अवलोकन करुन व जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व अति. सत्र न्या. नाझेरा शेख यांनी आरोपी उत्तम मोरोती भंडारे यास कलम ३०२ प्रमाणे दोषी धरुन जन्मठेप तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

Web Title: The husband is the wife of the murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.