'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही'; पंकजा मुंडेंनी घेतली ४ भाजप नेत्यांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 02:33 PM2022-10-05T14:33:57+5:302022-10-05T14:35:46+5:30

मी नाराज नाही, आमदारकीची यादी आली की मी नाराज असल्याच्या चर्चा होतात.

I am not carrying on the legacy of Gopinath Munde; Pankaja Munde took the names of 4 BJP leaders with narendra modi | 'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही'; पंकजा मुंडेंनी घेतली ४ भाजप नेत्यांची नावं

'मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही'; पंकजा मुंडेंनी घेतली ४ भाजप नेत्यांची नावं

googlenewsNext

मुंबई - लोकांचे प्रेम जबाबदारीची जाणीव करून देते. सर्वांच्या  एकजुटीची ही साक्ष आहे. तुमची ऊर्जा, प्रेम ही आमची ताकद आहे. आता संघर्ष बस्स झाला, भगवान बाबा नक्कीच पुढचा मार्ग सुखकर करतील, अशा भावना खासदार प्रीतम मुंडे यांनी आज व्यक्त केल्या. त्यानंतर, बोलताना पंकजा मुंडेंनीही जोरदार भाषण केलं. माझ्यावर आरोप केले जातात की मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवते. पण, मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतच नाही. मी त्यांचा वारसा चालवते ज्यांचा वारसा गोपीनाथ मुंडेंना चालवला, असे म्हणत पंकजा यांनी भाजपच्या ४ नेत्यांची नावे घेतली. भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.

मी नाराज नाही, आमदारकीची यादी आली की मी नाराज असल्याच्या चर्चा होतात. आता या चर्चा बस्स करा. आता मी २०२४ ची तयारी करत आहे. पक्षानं तिकीट दिलं तर मी २०२४ ची विधानसभा निवडणूक परळीतून लढवणार आहे. त्यामुळे, तुम्हीही २०२४ च्या तयारीला लागा, असे आवाहन पंकजा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं. तसेच, माझ्यावर आरोप केले जातात की मी गर्दी करतो. हा गुन्हा आहे का, हीच तर माझी ताकद आहे. माझ्यावर आरोप केले जातात मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवते. पण, मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवतच नाही. मी वारसा चालवते तो पंडित दिनदयार उपाध्याय यांचा, गोपीनाथ मुडेंच्या ज्यांच्या विचारांचा वारसा चालवला त्या पंडित दिनदयाल उपाध्याय यांचा, मी वारसा चालवतेय अटलबिहारी वाजपेयी यांचा, मी वारसा चालवतेय पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या नावाने अनेक योजनांची सुरुवात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, मी वारसा चालवतेय काश्मीरातून ३७० कलम हटवणाऱ्या अमित शहांच्या विचारांचा... असे म्हणत पंकजा मुंडेंनी भाजपच्या दोन दिवंगत थोर नेत्यांची आणि देशातील बड्या भाजप नेत्यांची नावं घेतली. ही नावे घेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नाराज न होण्याचं आणि २०२४ च्या तयारीला लागण्याचं आवाहनही केलं.  

आता संघर्ष बस्स झाला - प्रीतम मुंडे

पंकजा मुंडे संघर्ष करो या घोषणा आता बस्स झाले, आता पंकजा ताई तुम आगे बढो..अशी घोषणा द्या...तुमची ऊर्जा, प्रेम ही आमची ताकद आहे. आमच्या मेळाव्याचे हे वेगळेपण आहे. लोकांची लोकाची ताकद आहे. त्यांना भाकरी, निमंत्रण लागत नाही. त्यांना लागते ती फक्त ऊर्जा, भगवान बाबांचे विचार या मेळव्यातून जावेत. ही अपेक्षा, असेही प्रीतम मुंडे यावेळी म्हणाल्या.
 

Web Title: I am not carrying on the legacy of Gopinath Munde; Pankaja Munde took the names of 4 BJP leaders with narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.