‘मी नाही आम्ही’ हा पंडित दीनदयाल यांचा नारा होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:37 AM2021-09-27T04:37:02+5:302021-09-27T04:37:02+5:30
बीड : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानव कल्याणाचा संदेश दिला. ‘मी नाही ...
बीड : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानव कल्याणाचा संदेश दिला. ‘मी नाही आम्ही’ हा विचार त्यांनी सतत मांडण्याचा प्रयत्न केला. पंडितजींचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन स्वा. सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी केले.
येथील दीनदयाल शोध संस्थान व जन शिक्षण संस्थानच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा जोशी या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. अनिल तिडके यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. बाहेगव्हाणकर म्हणाले, अतिशय संघर्षमय परिस्थितीत पं. दीनदयाल यांनी शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीतही ते आपल्या ध्येयापासून ते कधीही विचलित झाले नाहीत. दीर्घकाळ जनसंघाचे महामंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. भारतभर भ्रमण करून त्यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी 'एकात्म मानवतावाद' हा विचार मांडला. डॉ. सीमा जोशी यांनी दीनदयाल शोध संस्थानच्या विविध उपक्रम आणि प्रशिक्षणाची माहिती दिली. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी सीमा मनुरकर यांनी केले. सूत्रसंचालन स. कार्यक्रम अधिकारी स्वाती जैन यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी सुदाम पालकर यांनी मानले. यावेळी स्नेहल केवडकर यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. यावेळी संचालक गंगाधर देशमुख, डॉ. अनिल बारकुल, रवींद्र देशमुख, प्रा. एस. एन. कुलकर्णी, हेमंत आडगावकर, नरेंद्र जवळेकर, लक्ष्मण बहिरवाल, अनिताताई वझुरकर, रेखा पिंगळे, जयश्री नेलवाडकर, मनीषा कुलकर्णी, तसेच शिक्षण संस्थांच्या प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी आणि दीनदयाळ शोध संस्थानचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
260921\26_2_bed_13_26092021_14.jpeg
दीनदयाळ