परळीकरांच्या डोळयात माझ्याबद्दल विश्वास दिसत आहे -धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:17 AM2019-10-15T00:17:15+5:302019-10-15T00:17:54+5:30

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परळीत येणार असले तरी परळीकरांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि विजय दिसत आहे असे विधनापरिषदेतील विरोधी पक्ष नेते व आघाडीचे परळी मतदार संघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी सांगितले

I feel confident in the eyes of the parliks - Dhananjay Munde | परळीकरांच्या डोळयात माझ्याबद्दल विश्वास दिसत आहे -धनंजय मुंडे

परळीकरांच्या डोळयात माझ्याबद्दल विश्वास दिसत आहे -धनंजय मुंडे

Next
ठळक मुद्देसुभाष चौक, बरकत नगर येथे जाहीर सभा : मित्रपक्षांची उपस्थिती

परळी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा परळीत येणार असले तरी परळीकरांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल असलेला विश्वास आणि विजय दिसत आहे असे विधनापरिषदेतील विरोधी पक्ष नेते व आघाडीचे परळी मतदार संघातील उमेदवार धनंजय मुंडे यांनी सांगितले
परळी शहराच्या सुभाष चौक, बरकतनगर भागात झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बाबु नंबरदार, कृ.उ.बा. समिती सभापती अ‍ॅड.गोविंदराव फड, उनगराध्यक्ष अय्युबभाई पठाण, वैजनाथराव सोळंके, एस.ए. समद, प्रा.डॉ.विनोद जगतकर, शकील कुरेशी, अजिजभाई, राजाखान गुत्तेदार, प्रा.रघुनंदन खरात, माणकि कांबळे, अन्नपुर्णाताई जाधव, अर्चनाताई रोडे, सुलभाताई साळवे, विजय भोयटे, केशव गायकवाड, शेख शम्मो, अनंत इंगळे, शंकर कापसे, शेख अजिज, महेंद्र रोडे, गायकवाड, जावेद कुरेशी, प्रितम जाधव, लालाखा पठाण, मुखीद कुरेशी, महेबुब कुरेशी, सय्यद सिराज, दिनेश गजमल, शेख सिकंदर, मेहमुद खान, दत्ता सावंत, गोविंद कुकर, जुबेर बाबा, फीरोज भाई, सिराज भाई आदींसह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...तर आज परळीची एमआयडीसी पूर्ण झाली असती
पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या मतदारांची बांधिलकी ठेवून विकासाला विरोध केला नसता तर आज परळीची एम.आय.डी.सी. पूर्ण झाली असती असे धनंजय मुंडे म्हणाले.
स्वपक्षातील आमदारांना लक्षवेधी मांडायला लावणे, नगरपालिकेचा फंड बांधकाम विभागाला स्थलांतरीत करणे, पालिकेची अडवणूक करणे या माध्यमातून विकासाला त्यांनी सातत्याने खिळ घातली असल्याचा आरोप करून परळीच्या जनतेचे जीवनमान बदलून टाकण्यासाठी मला आशीर्वाद देण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

Web Title: I feel confident in the eyes of the parliks - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.