मला परळीला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:53 PM2019-10-15T23:53:56+5:302019-10-15T23:54:52+5:30

परळीचे वातावरण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय इथला व्यापारी स्वत:ला सुरक्षित समजणार नाही, त्यासाठी व्यापाऱ्यांना सुरक्षा देऊन परळीच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देणे हाच आपला अजेंडा असल्याचे मत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले.

I want to make Parli fearless, corruption free | मला परळीला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचंय

मला परळीला भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त करायचंय

Next
ठळक मुद्देपंकजा मुंडे : व्यापाऱ्यांशी संवाद, सुरक्षेबरोबरच उद्योग वाढीची हमी

परळी : इथल्या व्यापारपेठेची एक वेगळी ओळख आहे, परंतु काही लोकांमुळे आज व्यापारी सुरक्षित नाही, त्याचा परिणाम बाजारपेठे बरोबरच शहराच्या विकासावर होत आहे. परळीचे वातावरण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त केल्याशिवाय इथला व्यापारी स्वत:ला सुरक्षित समजणार नाही, त्यासाठी व्यापाऱ्यांना सुरक्षा देऊन परळीच्या बाजारपेठेला गतवैभव मिळवून देणे हाच आपला अजेंडा असल्याचे मत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले.
शहरातील व्यापारी बांधवांशी सुसंवाद साधताना त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, इथला उद्योग व व्यापार वाढावा यासाठी अहमदनगर- बीड-परळी हा रेल्वेमार्ग पूर्ण होत आहे. त्याचे काम परळीपासून गतीने सुरू करण्यात आले आहे. परळी रेल्वे स्थानकाचा समावेश राष्ट्रीय तीर्थस्थळाच्या यादीत केल्यामुळे देशभरातील भाविक येथे येतील अशी सोय केली. वॉटर ग्रीड च्या माध्यमातून संपूर्ण मराठवाडयात पिण्याचे पाणी पुरवठा केले जाणार आहे. परळी वैद्यनाथ देवस्थानच्या विकासासाठी १३३ कोटी रु पयाचा आराखडा मंजूर करून घेतला. राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्ताने परळी हे देशाच्या नकाशावर आणता आले. इथला व्यवसाय आणि उद्योग वाढण्यासाठी हे निश्चित उपयोगी ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, नंदकिशोर बियाणी, भिकूलाल भन्साळी, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, दत्ताप्पा इटके, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष विनोद सामत, शांतीलाल जैन, विकासराव डूबे, विजय वाकेकर, संदीप लाहोटी, राजाभैय्या पांडे, प्रा. विजय मुंडे, ओमप्रकाश सारडा, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख राजेश विभूते, रिखबचंद कांकरिया, विष्णू देवशेटवार, गोल्डी भाटिया, माणिक कांदे, रतन कोठारी, सचिन दरक, श्रीकांत चांडक, निर्मळे, वैजनाथ कोल्हे आदींसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परळीच्या भाग्याची दिशा निश्चित करणार
परळी शहर हे सुसंस्कृत व संस्कारित करण्याचे लोकनेते मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तुमचे आशीर्वाद मला आवश्यक आहेत.
गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येत आहेत. त्यांचं येणं हे परळीचा नावलौकिक वाढविणार असून शहराच्या भाग्याची दिशा निश्चित करणार आहे.
त्यामुळे नेत्याची नैतिक ताकद ओळखुन सोबत रहा, कुणाच्याही धमक्यांना न घाबरता मला आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: I want to make Parli fearless, corruption free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.