पराभवाला मीच जबाबदार, पक्षातील लोकांनीच गद्दारी केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 11:58 PM2019-10-30T23:58:02+5:302019-10-30T23:58:31+5:30

पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली. कटप्पा बाहूबलीच्या पोस्टर प्रमाणे पाठीमागून खंजीर खुपसल्याचे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पराभवाचे खापर आ. सुरेश धसांवर फोडले.

I was responsible for the defeat, and only the people of the party made the betrayal | पराभवाला मीच जबाबदार, पक्षातील लोकांनीच गद्दारी केली

पराभवाला मीच जबाबदार, पक्षातील लोकांनीच गद्दारी केली

Next
ठळक मुद्देभीमराव धोंडे : चिंतन बैठकीत सुरेश धसांवर टीकास्त्र; आता जनतेसाठी वेळ देणार; कार्यकर्त्यांनीही व्यक्त केल्या तीव्र भावना

आष्टी/ कडा : तिकीट वाटपावेळीच आ.सुरेश धस यांनी माझ्याविषयी चुकीचा संदेश वरिष्ठांना देण्याचे वेळोवेळी काम केले. आष्टी विधानसभा मतदारसंघात मी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. पायी मतदारसंघातील गावोगावी गेलो. एवढे करूनही जनतेने मला डावलले. माझा पराभव झाला. त्याला मीच जबाबदार आहे. पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली. कटप्पा बाहूबलीच्या पोस्टर प्रमाणे पाठीमागून खंजीर खुपसल्याचे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पराभवाचे खापर आ. सुरेश धसांवर फोडले.
आष्टी येथील भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात चिंतन बैठकीत ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. वाल्मिक निकाळजे,बबन झांबरे, दिलीप हंबर्डे, अशोक साळवे,अनुरथ सानप, महेंद्र गर्जे, अजय धोंडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
धोंडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील लीड, केलेली विकास कामे यामुळे माझा विजय निश्चित होता. पण हा आष्टीचा बाबा मला उमेदवारी मिळण्याआधीपासून गद्दारी करत आला. त्याने माझा पराभव करून शेवट केला. आ. धस यांनी प्रामाणिकपणे काम केले नाही. आपण यापुढे जनतेच्या सुख दु:खात सामील होऊन काम करण्यात वेळ देणार असल्याचे धोंडे म्हणाले.
बैठकीत माजी जि.प.सदस्य रामराव खेडकर यांनी धसांवर टिकेची झोड उठविली. यावेळी अ‍ॅड. रत्नदीप निकाळजे, ईश्वर गव्हाणे, बाबुलाल भंडारी, एन. टी.गर्जे, शहादेव गिते, दादासाहेब जगताप, बाजीराव वाल्हेकर, पांडुरंग ननागरगोजे, अ‍ॅड. हनुमंत थोरवे, रामराव खेडकर, अनुरथ सानप सह मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलान दादा बन तर आभार शंकर देशमुख यांनी मानले.
शिक्षक, स्वीय सहायकांवरही आगपाखड
मतदारसंघातील निवडणुकीचे नियोजन ज्या त्या गावातील शिक्षक यांच्या हातात दिले गेल्याने स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याने नियोजन ढासळले.
निवडणूक काळात शिक्षकांना बाजुला ठेऊन त्याची धुरा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर देऊन मुलासारखा विश्वास ठेवला तरच कार्यकर्ते काम करतील.
एकही स्वीय सहायक कामाचा नाही. सर्व सामान्य जनतेला प्रतिसाद देत नाहीत. आता जुने बदलुन नवीन तरूण पोरं जवळ करून त्यांच्यावरच धुरा द्या असा सूर कार्यकर्त्यांनी काढला.

Web Title: I was responsible for the defeat, and only the people of the party made the betrayal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.