ऑनलाईन मार्गदर्शनातून बहुमूल्य पक्ष्यांची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:04+5:302021-05-21T04:35:04+5:30

अंबाजोगाई : येथील बार्टीच्या वतीने पक्ष्यांची ओळख व निसर्गाची देणगी, या विषयावर पक्षीमित्र डॉ. शुभदा लोहिया यांनी मार्गदर्शन केले. ...

Identification of valuable birds through online guidance | ऑनलाईन मार्गदर्शनातून बहुमूल्य पक्ष्यांची ओळख

ऑनलाईन मार्गदर्शनातून बहुमूल्य पक्ष्यांची ओळख

Next

अंबाजोगाई : येथील बार्टीच्या वतीने पक्ष्यांची ओळख व निसर्गाची देणगी, या विषयावर पक्षीमित्र डॉ. शुभदा लोहिया यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. तो रोखण्यासाठी महाराष्ट्रत लॉकडाऊन सुरू करण्यात आल्यामुळे बार्टी मुख्यालयाच्या वतीने समतादूतांच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उद्योग, व्यापार व शेती या क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांकडून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच भारतीय संविधान विषयावर जनजागृती करण्यात आली.

सध्या ग्रामीण, शहरी भागात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने जनतेमध्ये भीती, संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी बार्टीच्या वतीने सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन प्रबोधन करण्यात येत आहे. प्रबोधनाच्या या आगळ्यावेगळ्या भागाद्वारे लोकांची मानसिक स्थिरता मिळण्यासाठी त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने पक्षीमित्र डॉ. शुभदा लोहिया यांचे व्याख्यान वर्षा देशमुख यांनी आयोजित केले होते.

डॉ. शुभदा लोहिया यांनी सर्व श्रोत्यांना अत्यंत सुंदर, सोप्या व सुटसुटीत भाषेत अनेक अनमोल पक्ष्यांची भेट स्लाईडद्वारे सादरीकरण करून पर्यावरण समतोल कसा राखावा, त्यासाठी आपण काय केले पाहिजे, हेही सांगितले. त्यांच्या या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ सर्व श्रोत्यांना मिळाला.

बीड जिल्हा समतादूत प्रकल्पाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. बार्टीचे प्रकल्प अधिकारी सर्वेश कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन वर्षा देशमुख यांनी केले. व्यंकटेश जोशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमात समतादूत प्रदीप गुजर, भीमा कानधरे, अमोल तांदळे, मस्के, सय्यद आखेब, सुग्रीव शिंदे, ज्ञानबा मात्रे, ज्ञानेश्वर ढगे, पुरुषोत्तम स्वामी, संजय गुजर, तुकाराम पिंप्रीकर, नानाभाऊ गव्हाणे, व्यंकटेश जोशी, वर्षा देशमुख, प्रा. अभिजित लोहिया, डॉ. ज्योती शेप, अंजली चरखा, डॉ. सुशील घाडगे, प्रा. अल्का तडकलकर यांच्यासह अंबाजोगाई व इतर विविध जिल्ह्यांतून अनेक जण सहभागी झाले होते.

===Photopath===

200521\avinash mudegaonkar_img-20210520-wa0074_14.jpg

Web Title: Identification of valuable birds through online guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.