कलेला मेहनतीची व जिद्दीची जोड असेल, तर कसल्याही व्यवसायात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:03+5:302021-08-14T04:39:03+5:30
लोखंडी सावरगाव : आजच्या स्पर्धेच्या युगात लाखो रुपये खर्च करून, व्यवसाय करणे अवघड झाले आहे, पण अंगात ...
लोखंडी सावरगाव : आजच्या स्पर्धेच्या युगात लाखो रुपये खर्च करून, व्यवसाय करणे अवघड झाले आहे, पण अंगात कला असेल व या कलेला मेहनतीची व जिद्दीची जोड असेल, तर कसल्याही व्यवसायाला यश मिळते, हे दाखवून दिले आहे. येथून जवळच असलेल्या श्रीपतरायवाडी या छोट्याशा खेड्यातील श्रावण प्रल्हाद तारळकर या सुशिक्षित बेकार असलेल्या युवकाने. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेऊन नोकरीच्या किंवा दुसऱ्या कोणत्या व्यवसायाच्या मागे न लागता, आपला पारंपरिक कुंभारीचा व्यवसाय सुरू करून आपली उपजीविका भागवू लागला.
या व्यवसायात मेहनत जास्त व मोबदला कमी, तसेच बाजारात सिमेंट, लोखंड, प्लास्टीकची भांडी उपलब्ध होऊ लागल्याने कुंभाराच्या नक्षीदार भांड्याची मागणी कमी होऊ लागली, तसेच परराज्यातील कारागिरांनी या धंद्यात शिरकाव केल्यानेही येथील कुंभाराचा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे. अशा या थंडावलेल्या व्यवसायाने जीवनात निराश न होता आपल्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत, त्यांनी अंबेजोगाई परिसरात गणपती महालक्ष्मीच्या सणाच्या वेळी पाहणी केली.
गणपती, महालक्ष्मीच्या सणाला मूर्ती व मुखवटे बाहेरून विक्रीसाठी येत आहेत. या मूर्तीची त्याने बारकाईने पाहणी करून, साचे उपलब्ध केले आपल्या तुटपुंज्या रकमेत या मूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला या तांत्रिक युगात बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यात दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळेही हा व्यवसाय बराच थंडावला आहे. दोन वर्षांपासून गरिबाचा फ्रीज (माठ) ही मार्केट नसल्यामुळे विक्री झाला नाही. त्यामुळे या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या हा कारागीर नव्या जोमाने नव्या उमेदीने महालक्ष्मी गणपती सणाला लागणारी मुखवटे, मूर्ती, खेळणी तयार करत आहे की, गणराया हे संकट तारून नेऊन परिस्थिती पूर्ववत करेल व आमच्या मूर्तींना मार्केट मिळेल. अशा प्रकारच्या आशा मनाशी बाळगून स्वतःसह कुटुंबातील पत्नी-मुले या मूर्ती बनविण्यात मग्न झाल्याचे दिसून आले.
130821\20210804_152340.jpg~130821\20210804_152548.jpg
पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन केला व्यवसाय सुरू~पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन केला व्यवसाय सुरु