खालच्या पातळीवर टीका केली तर, ऐकायची देखील तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:17 AM2019-10-19T00:17:29+5:302019-10-19T00:17:33+5:30

पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले.

If criticized at a lower level, be prepared to listen as well | खालच्या पातळीवर टीका केली तर, ऐकायची देखील तयारी ठेवा

खालच्या पातळीवर टीका केली तर, ऐकायची देखील तयारी ठेवा

Next
ठळक मुद्देसुरेश धस : दिंद्रुडच्या सभेत विरोधकांना दिला स्पष्ट शब्दात इशारा

माजलगाव : पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले. रमेश आडसकर हेच माजलगाव मतदार संघाचे भविष्य आहे. जिल्ह्यातील सर्वच जागा महायुतीच्या विजयी होणार असल्याचा विश्वासही आ. धस यांनी व्यक्त केला.
भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप व रयतक्र ांती महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ दिंद्रुड येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ओमप्रकाश शेटे, माजी जि.प. अध्यक्षा मिरा गांधले, नितीन नाईकनवरे, डॉ. भगवानराव सरवदे, शिवसेना नेते सतीश सोळंके, आप्पासाहेब जाधव, हनुमान कदम, बबनराव सिरसट, अविनाश जावळे, संतोष यादव, बंडू खांडेकर, नितीन काळे, संजीवनी राऊत याप्रसंगी उपस्थित होते. ओमप्रकाश शेटे म्हणाले, दिंद्रुडसह जि. प. गटात शासनाने भरघोस निधी दिल्यामुळे या गटाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रि या गतिमान झाली आहे. तसेच लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार सत्तेत बसवण्यासाठी येथील मतदार बांधव रमेश आडसकर यांच्या पाठिशी खंबीर उभा राहतील असा विश्वास व्यक्त केला. रमेश आडसकर म्हणाले, धारूर, वडवणी, माजलगांव तालुक्यातील गावांना पंचवीस पंधरा अंतर्गत अनेक विकासात्मक कामे केली आहेत. वॉटरग्रीडच्या माध्यमातून मोहखेडच्या तलावात पाणी आणण्यासाठी व ग्रामीण भागात विकासाची गंगा आणण्यासाठी मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मिरा गांधले, बंडू खांडेकर, संजिवनी राऊत यांनी आडसकरांना विजयी करण्याचे आवाहन केले. धारूर व माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते.
भाजपने पाच वर्षात विकासगंगा आणली
सुरेश धस म्हणाले, मुंडे साहेबांना शेवटच्या दिवसांत प्रचंड मानसिक त्रास दिला, त्या धनंजय मुंडेंना सुरेश धस व रमेश आडसकर यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. प्रकाश सोळंके हे नाटकी आहेत. माझी ही शेवटची निवडणूक आहे, म्हणून मतदारांशी भाविनक साद घालणे हे सोळंकेच्या नाटकाची परिसीमा असल्याची टीका त्यांनी केली. भाजपने गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी परिश्रम घेतले असल्याचे सांगितले.

Web Title: If criticized at a lower level, be prepared to listen as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.