सीना धरणातून कालव्याद्वारे बंधारे भरल्यास पाणी प्रश्न लागेल मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:01+5:302021-04-30T04:43:01+5:30
या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये सीना धरणातून पाणी सोडण्याबाबत आपणाकडे मागणी केली होती. आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून ...
या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये सीना धरणातून पाणी सोडण्याबाबत आपणाकडे मागणी केली होती. आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना गुरुवारी पाण्याची काही प्रमाणात आवश्यकता असल्याने, या भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सीना धरणातून पाणी सोडता येणे शक्य आहे का, याबाबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवत काही प्रमाणात पाणी सोडण्यात हरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच डाव्या कालव्यातून पाणी सोडून त्याखालील असणारे बंधारे, नाले भरून घेण्याच्या सूचना आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याचे आ. आजबे म्हणाले. यावर्षी तालुक्यात कोठेही पाण्याची टंचाई भासली नाही; त्यामुळे पाण्याचे टँकर लावण्याची आवश्यकता भासली नाही. पावसाळाही तोंडावर आला आहे. सीना धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा शिल्लक आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला जाणार असल्याचे आ. आजबे यांनी सांगितले.