सीना धरणातून कालव्याद्वारे बंधारे भरल्यास पाणी प्रश्न लागेल मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:09+5:302021-05-01T04:32:09+5:30

आष्टी : सीना धरणातून कालव्याद्वारे बंधारे भरल्यास उन्हाळी पिकांसाठी लागणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. ...

If dams are filled from Sina dam through canal, there will be water problem | सीना धरणातून कालव्याद्वारे बंधारे भरल्यास पाणी प्रश्न लागेल मार्गी

सीना धरणातून कालव्याद्वारे बंधारे भरल्यास पाणी प्रश्न लागेल मार्गी

Next

आष्टी : सीना धरणातून कालव्याद्वारे बंधारे भरल्यास उन्हाळी पिकांसाठी लागणाऱ्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. या संदर्भात आमदार बाळासाहेब आजबे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविल्याचे ते म्हणाले.

या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये सीना धरणातून पाणी सोडण्याबाबत आपणाकडे मागणी केली होती. आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना गुरुवारी पाण्याची काही प्रमाणात आवश्यकता असल्याने, या भागातील शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सीना धरणातून पाणी सोडता येणे शक्य आहे का, याबाबत सविस्तर माहिती घेऊन चर्चा केली. अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवत काही प्रमाणात पाणी सोडण्यात हरकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच डाव्या कालव्यातून पाणी सोडून त्याखालील असणारे बंधारे, नाले भरून घेण्याच्या सूचना आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्याचे आ. आजबे म्हणाले. यावर्षी तालुक्यात कोठेही पाण्याची टंचाई भासली नाही; त्यामुळे पाण्याचे टँकर लावण्याची आवश्यकता भासली नाही. पावसाळाही तोंडावर आला आहे. सीना धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा शिल्लक आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला जाणार असल्याचे आ. आजबे यांनी सांगितले.

Web Title: If dams are filled from Sina dam through canal, there will be water problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.