सावित्रीबाईंचे गुण अंगीकारल्यास कार्य फलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:27 AM2021-01-04T04:27:24+5:302021-01-04T04:27:24+5:30
बीड : सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचा एक जरी गुण अंगिकारला तरी त्यांच्या कार्याचे फलित होईल, असे ...
बीड : सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचा एक जरी गुण अंगिकारला तरी त्यांच्या कार्याचे फलित होईल, असे प्रतिपादन सहकार्यवाह प्रा. चंद्रकात मुळे यांनी स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलात आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात केले. यावेळी मुख्याध्यापक प्रदीप देशमुख यांच्यासह ९ वी व १० वीच्या रेणुका बुगदे, आर्या देशमुख, वैष्णवी जाधव, श्रुती कुडके, माधवी मोकाशे, ज्ञानेश्वरी तालखेडकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करुन त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सुरुवातीला प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाले. प्रास्ताविक प्रा. रत्नमाला सोनवणे, सूत्रसंचालन आरती कुलकर्णी व आभार प्रदर्शन सुजाता चिंचपूरकर यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक विजेंद्र चौधरी, विभाग प्रमुख प्रा. शशिकांत पसारकर, संस्था अभ्यासपूरक प्रमुख उमेश जगताप हे उपस्थित होते.
शेडाळा येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम
बीड : आष्टी तालुक्यातील शेडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख ज्ञानदेव आडसरे, मुख्याध्यापक बापूसाहेब फसले, रामेश्वर सुंबे, जयश्री नवले, कैलास अकोलकर, महादेव आमले, जयश्री ढोले व इतर उपस्थित होते .
राष्ट्रीय माध्यमिक विद्यालयात जयंती कार्यक्रम
बीड : येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली. अध्यक्ष म्हणून प्राचार्य आर. बी. चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून के.बी. तोष्णीवाल यांची उपस्थिती होती. प्रस्तावना प्रा. आर. एन. गायकवाड यांनी केली. कोविड संदर्भातील शासन नियमाचे पालन करून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री शिवाजी विद्यालयात जयंती साजरी
बीड : शहरातील श्री शिवाजी विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात रविवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक राजकुमार कदम तर व्यासपीठावर पर्यवेक्षक बी.डी. मातकर, पर्यवेक्षक गिरीश चाळक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील शिक्षिकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बि.डी. मातकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप राजकुमार कदम यांनी केला. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.