सरपंच असावा तर असा ! कडा ग्रामपंचायतचे सरपंच, कर्मचारी कोरोना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करून जोपासतायत माणुसकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:24+5:302021-05-11T04:36:24+5:30

आष्टी : तालुक्यातील कडा ग्रामपंचायतचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे हे निराधारांना आधार देऊन अडचणीतील गरजू व्यक्तींना, अपघातग्रस्त, ...

If there should be a Sarpanch, then so be it! Kada Gram Panchayat Sarpanch, Employee Corona | सरपंच असावा तर असा ! कडा ग्रामपंचायतचे सरपंच, कर्मचारी कोरोना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करून जोपासतायत माणुसकी

सरपंच असावा तर असा ! कडा ग्रामपंचायतचे सरपंच, कर्मचारी कोरोना मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करून जोपासतायत माणुसकी

Next

आष्टी : तालुक्यातील कडा ग्रामपंचायतचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे हे निराधारांना आधार देऊन अडचणीतील गरजू व्यक्तींना, अपघातग्रस्त, निराधारांना नेहमीच मदत करून आधार देतात. कोरोनाकाळात गोरगरीब कुटुंबांना किराणा अन्न धान्य वाटप केले असून अनाथ व्यक्तींवरती स्वतः अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाने मृत झालेल्या १० ते १२ व्यक्तींवर सरपंच अनिल ढोबळे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.

कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करून माणुसकी धर्म जोपासत आहेत.

तालुक्यातील कडा ग्रामपंचायत मोठी आहे. इतर गावातील ग्रामस्थांना आमच्या गल्लीत आज पाणी आले नाही, लाईट नाही, साफसफाई नाही, अशी ओरड सुरू असते. याला मात्र कडा ग्रामपंचायतचे कर्मचारी अपवाद आहेत. विनातक्रार हे कर्मचारी गावातील नळ दुरुस्ती, साफसफाई, सर्व कामे करतात. दैनंदिन कामकाजाबरोबरच कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी वाढली आहे. कडा गावामध्ये ४ कोविड सेंटर असून कडा, आष्टी परिसरातील नागरिक उपचार घेण्यासाठी येत असतात. या उपचारादरम्यान दुर्दैवाने एखादा व्यक्ती मृत झाली तर कडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतात. या मृतांची जबाबदारी कडा ग्रामपंचायतवरच असते. कोविड सेंटर येथील डाॅक्टर ग्रामपंचायतला कळवतात. या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची सर्व जबाबदारी सरपंच अनिल ढोबळे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, कर्मचारी संतोष जगताप, किशोर कर्डीले, सर्जेराव करांडे, सचिन कर्डिले, सनी साबळे हेच पार पाडतात. रात्री उशिरा अंत्यविधी आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज असतात. दिवस असो की रात्र, सरपंच, ग्रामसेवक,ग्रा.पं. कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडताहेत. दैनंदिन कामांसह कोविडमध्ये मृत पावलेल्यांना अखेरचा निरोप देत सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

===Photopath===

100521\avinash kadam_img-20210510-wa0078_14.jpg

Web Title: If there should be a Sarpanch, then so be it! Kada Gram Panchayat Sarpanch, Employee Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.