तिकीट दिले तर तयारीला लागेल, आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही: पंकजा मुंडे

By अनिल लगड | Published: October 5, 2022 02:42 PM2022-10-05T14:42:17+5:302022-10-05T14:43:14+5:30

पंकजा मुंडे यांनी मांडली रोखठोक भूमिका

If tickets are given for 2024 Vidhansabha, preparations will have to be made, now im not going to please anyone: Pankaja Munde | तिकीट दिले तर तयारीला लागेल, आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही: पंकजा मुंडे

तिकीट दिले तर तयारीला लागेल, आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही: पंकजा मुंडे

Next

सावरगाव घाट ( बीड) : आगामी 2024 च्या विधान सभेत पक्षाने तिकीट दिले तर तयारीला लागेल. मला, पक्षाला, नेत्याला त्रास द्यायचा नाही. लक्ष 2024 ची तयारी करू. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर कमळाशिवाय दुसरे बटन लावले नाही. मी आता कुणापुढे पदर पसरायला जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मांडली.

भगवान भक्ती गड येथे मेळाव्यास पंकजा मुंडे संबोधित करत होत्या. दरवर्षी प्रमाणे भगवान भक्तीगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात, कर्नाटक येथून अनेक भाविक भगवान भक्ती गडावर दर्शनासाठी आले आहेत. यावेळी आयोजित मेळाव्यास माजी मंत्री तथा भाजप राष्ट्रीय सचिन पंकजा मुंडे यांनी संबोधित केले. त्या म्हणाल्या, राज्यातुन, राज्याबाहेरून लोक आलेत. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रूपे असतात. मी देवीच्या पुढे नतमस्तक होऊन गोरगरीब, ऊस तोडणी मजुरांसाठी आशीर्वाद मागते. दसरा, नवरात्रीच्या सर्वाना शुभेच्छा. आता दसरा मेळावा आहे. हा मेळावा चिखलफेक करणाराचा नाही. चिखल तुडविणाराचा आहे.

मी कधी थकणार नाही, मी झुकणार नाही

मी कधी विरोधकांवर टीका केली नाही. चर्चा, अफवा पसरवितात. ही गर्दी ही शक्ती आहे. प्रीतम म्हणाल्या, संघर्ष करा घोषणा बंद करा. पण संघर्ष नाकारू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनाही संघर्ष करावा लागला. भगवानबाबांना संघर्ष करावा लागला. गोपिनाथ मुंडे यांना संघर्ष करावा लागला. मी संघर्षाला घाबरत नाही. मी वचनाला चुकणार नाही, मी कधी थकणार नाही, मी झुकणार नाही, असे ही पंकजा मुंडे म्हणाल्या.

तिकीट दिले तर तयारीला लागले
राजकारण करताना मानवतेचे कल्याण विसरायला नको. सभा घेण्यासाठी मी फिरले की नाही. मी राज्यात फिरले. आमदार वाढले तर पक्षाची ताकद वाढते. मी 17 वर्षे राजकारणात आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही. संघटन श्रेष्ट आहे. मी नाराज नाही. मी मंत्री, आमदार नाही. स्वाभिमान आहे. मला गर्व नाही. मी असत्य कधी बोलणार नाही.  सत्य कधी पराजित होत नाही. 2024 ला पक्षाने तिकीट दिले तर तयारीला लागेल. मला , पक्षाला नेत्याला त्रास द्यायचा नाही, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: If tickets are given for 2024 Vidhansabha, preparations will have to be made, now im not going to please anyone: Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.