नारीने ठरवले तर नगरी सुंदर होण्यास विलंब लागणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:29 AM2021-03-14T04:29:16+5:302021-03-14T04:29:16+5:30

शिरूर कासार : नगर पंचायतीच्या स्वच्छता विभागांतर्गत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात नारीने ठरवले तर नगरी स्वच्छ ...

If the woman decides, it will not be long before the city becomes beautiful | नारीने ठरवले तर नगरी सुंदर होण्यास विलंब लागणार नाही

नारीने ठरवले तर नगरी सुंदर होण्यास विलंब लागणार नाही

Next

शिरूर कासार : नगर पंचायतीच्या स्वच्छता विभागांतर्गत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात नारीने ठरवले तर नगरी स्वच्छ व सुंदर होण्यास विलंब लागणार नाही. आता महिलांना गरजेपुरते तरी कायद्याचे ज्ञान आवश्यक असल्याचे उपस्थित मार्गदर्शकांनी सांगितले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने नगर पंचायतीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. ज्योत्सना तवटे (गाडेकर ) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी नगरसेविका अश्विनी भांडेकर होत्या.

यावेळी ॲड. तवटे म्हणाल्या, गरजेपुरता तरी आता महिलांना कायदा माहिती असायला पाहिजे. महिलांसाठी कायदे सक्षम असल्याचे त्या म्हणाल्या. नारींनी ठरवले तर नगरी स्वच्छ व सुंदर होण्यास उशिर लागणार नाही, असे अश्विनी भांडेकर यांनी सांगितले. आपल्या नगर पंचायतीने स्वच्छ नगर या अभियानात भाग घेतला असून त्या अनुषंगाने सर्व निकषात आपण चांगले गुणांकन घेण्यासाठी प्रामुख्याने महिलांचे मोठे योगदान आवश्यक असून शिरूरच्या महिलांकडून प्रतिसाद मिळेल असा विश्वास प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी यावेळी व्यक्त केला .

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून ॲड. शितल लाड, ॲड. अमृता परदेशी, मोहिनी भालेराव, शहर समन्वयक ज्योती सातपुते, बालाजी कदम, गणेश गोरमाळी , मन्सूर शेख, दर्शिका सोनवणे, रेखा भोजने, सागर कुंभार व अंगद पानसंबळ आदींसह महिला उपस्थित होत्या.

===Photopath===

130321\vijaykumar gadekar_img-20210313-wa0018_14.jpg

===Caption===

शिरूरमध्ये नगर पंचायतच्या वतीने स्वच्छ  सर्वेक्षण अभियानांतर्गत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: If the woman decides, it will not be long before the city becomes beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.